
श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर खूप उपवास केले जातात. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा तळणीचे पदार्थ बनवून खाल्ले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणा खाल्ल्यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. त्यामुळे उपवास केल्यानंतर सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.न उपवासाला केवळ साबुदाणा खाण्याऐवजी राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले थालीपीठ सुद्धा खाऊ शकता. खमंग आणि कुरकुरीत थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागतात. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन्स, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे इतर दिवशी सकाळच्या नाश्त्यात काहींना काही वेगळे इच्छा झाल्यास झटपट राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)