Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भोपळ्याचे भरीत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि गरमागरम भाकरीसोबत चव भारी लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 10:30 AM
कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर मसालेदार चमचमीत भरीत असेल तर चार घास जास्त जातात. याशिवाय जेवणाची चव सुद्धा वाढते. पण नेहमीच वांग्याचं भरीत बनवून खाण्याऐवजी भोपळ्याचा वापर करून बनवलेले भरीत सुद्धा नक्की ट्राय करून पहा. भोपळ्यापासून बनवलेले भरीत भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत अतिशय चविष्ट लागते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही या पद्धतीने मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. भोपळ्यामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व क, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यासाठी भोपळ्याचे भरीत किंवा भोपळ्याचा वापर करून बनवलेले विविध पदार्थ खावेत. भोपळा सहज पचन होतो. त्यामुळे पोटाच्या समस्या वाढू लागल्यास पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया अस्सल पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • लाल रंगाचा भोपळा
  • पाणी
  • दही
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • कढीपत्ता
  • हळद
  • शेंगदाण्याचा कूट
  • कोथिंबीर
  • हिंग
Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

कृती:

  • भोपळ्याचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, भोपळ्याचे तुकडे करा आणि भोपळ्याच्या वरील साल काढून टाका.
  • कुकरच्या भांड्यात पाणी, भोपळ्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावा आणि ५ ते ६ शिट्ट्या काढून घ्या.
  • शिजवलेला भोपळा थंड झाल्यानंतर मॅशरच्या मदतीने बारीक करून घ्या आणि टोपात काढा.
  • फोडणीच्या कढईमध्ये तूप गरम करून त्यात हिंग, कढीपत्त्याची पाने, जिरं आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घाला आणि व्यवस्थित भाजून घ्या.
  • सगळ्यात शेवटी गॅस बंद करून त्यात हळद घाला आणि फोडणी हलकीशी थंड करण्यासाठी ठेवा.
  • भोपळ्याच्या मिश्रणात दही आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा आणि त्यावर तयार केलेली फोडणी ओतून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाल भोपळ्याचे भरीत.

Web Title: How to make red pumpkin bharta at home simple food recipe traditional maharashtrian recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.