उपवासाची रताळ्याची भाजी
5 ऑगस्टपासून सगळीकडे श्रावण महिन्याला सुरुवात झाली. श्रावण महिना हा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात अनेक महिला पुरुष श्रावणी सोमवारी आणि शनिवारी उपवास करतात. श्रावणात केलेल्या उपवासांना विशेष महत्व असल्यामुळे अनेक लोक या दिवसांमध्ये उपवास करतात. श्रावण महादेवाची मनोभावे पूजा केल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रावण महिन्यात उपवास करू शकता. उपवासाच्या दिवशी अनेक महिला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा हेच पदार्थ खाऊन संपूर्ण दिवस काढतात. पण काहीवेळा साबुदाण्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावणी सोमवारच्या उपवासाला रताळ्याची भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कधी साबुदाण्याचा पराठा खाल्ला आहे का? उपवासासाठी उत्तम पर्याय