प्रेग्नेंसीच्या(pregnancy) काळामध्ये महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात. प्रेग्नेंसीमध्ये मॉर्निंग सिकनेस आणि हार्ट बर्नमुळे प्रेग्नेंसीच्या(pregnancy) फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये महिलांसाठी व्यवस्थित डाएट घेणे थोडे कठीण होऊन जाते. अशावेळी कधी मळमळ, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होतात. कधी कधी काही खावेसे वाटत नाही, काही खाण्याची इच्छा न होणे, मूड स्विंग्स(mood), इतर शारीरिक(body) आणि मानसिक तक्रारी अशा बऱ्याचश्या गोष्टींमधून स्त्रियांना जावे लागते. पण त्याच वेळी तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी आणि बाळाला योग्य ते पोषण मिळण्यासाठी तुम्हाला हेल्दी फूडचे डाएट घ्यावेच लागते. करण तुमच्यावरच तुमच्या बाळाची योग्य वाढ अवलंबून असते. व्यवस्थित खाण्याचे टार्गेट(traget) ठेवा. त्यासाठी तुम्ही दिवसातून तीन वेळा पोटभर अन्न(food) घ्यायला हवे आणि एक किंवा दोन वेळेस हलके स्नॅक्स घ्यायला हवे. तुम्ही जे अन्न घेत आहात ते तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या तब्येतीसाठी चांगले असायला हवे.
तुम्ही जे काही खात असाल त्याच्या चवीपेक्षा(testy) ते किती हेल्दी आहे याकडे लक्ष द्या. तुमच्या आहारात कायम पोषक घटक असू द्या. प्रेग्नेंसीच्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पोषक आहार घेणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी तुमच्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. प्रेग्नेंसीच्या काळामध्ये शरीरात फॉलिक ऍसिडची आवश्यकता असते. त्यासाठी डॉक्टर तुम्हाला ताज्या हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्यांमध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण बऱ्यापैकी असते.