Hug Day 2025: मैत्री, प्रेम विविध नातेसंबंधातील मिठीचा काय अर्थ असतो ?
Day 2025 Celebration : असं म्हणतात की कुठल्याही नात्यातलं प्रेम हे शब्दांप्रमाणेच कृतीतून देखील व्यक्त होत असतं. काळजी आणि आपुलकी हा प्रेमाचा अंश आहे तसंच प्रिय व्यक्तीला मारलेली मिठी हे त्या व्यक्तीवरचं प्रेम आणि विश्वास व्यक्त करण्याची कृती आहे. मैत्री, रिलेशनशिप आणि कोणतेही नातेसंबंध किती जवळचे आणि किती घट्ट आहेत हे प्रिय व्यक्तीला मिठी मारताना स्पष्ट होतं. याप्रमाणेच विविध नातेसंबंधातील मिठीचे देखील विविध अर्थ आहेत.
Promise Day 2025 : वचनांचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी गोष्ट
प्रेमाची मिठी:
प्रियकर प्रेससी किंवा पती पत्नी या नात्यात जोडणाऱ्याला देण्यात येणाऱ्या मिठीमध्ये मानसिक आणि शारीरिक प्रेम व्यक्त केलं जातं. ही मिठी सर्वसाधारणपणे रोमँटिक नात्यांमध्ये किंवा प्रिय व्यक्तींमध्ये असते. आपल्या प्रियकराशी किंवा प्रियमैत्रिणीसोबत दिलेली मिठी, जी त्यांच्या जवळीकतेचा आणि आपुलकीचा अनुभव देणारी असते. या मिठीमुळे नात्यातील प्रेम अधिकच घट्ट होतं. आपल्या प्रियकराशी किंवा प्रियमैत्रिणीसोबत दिलेली मिठी, जी त्यांच्या जवळीकतेचा आणि आपुलकीचा अनुभव देणारी असते.
स्नेहाची मिठी:
प्रत्येक नात्यातील प्रेमाचा अर्थ हा वेगवेगळा असतो, तसंच त्या प्रेमातील मिठीचा अर्थ सुद्धा वेगवेगळा असतो. कुटुंबातील व्यक्तीला मारलेली मिठी ही आदर आणि जिव्हाळा व्यक्त करते. आई मुलं किंवा वडिलांना मुलांनी मारलेली मिठी ही त्या नात्यातला विश्वास व्यक्त करत असते. ही मिठी सामान्यत: एका व्यक्तीला इतरांची काळजी आणि भावना व्यक्त करण्याचा मार्ग असतो.
Promise Day 2025 का साजरा करतात? ‘प्रॉमिस डे’निमित्त स्वतःला कोणते वचन द्याल
मैत्रीतली मिठी
जिथे विश्वास आणि आपुलकी असते अशा मित्र किंवा मैत्रीणीला मारलेली मिठी तुमच्यातली मैत्री किती घट्ट आहे, य़ाची जाणीव करुन देते. मैत्रीतली मिठी सामान्यत: दोन व्यक्तींना एकमेकांची काळजी असल्याची भावना व्यक्त केली जाते.
आदराची मिठी:
आदराची मिठी म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एक प्रकारे इज्जत आणि कृतज्ञता दर्शवण्यासाठी दिली जाते. हे विशेषत: त्या व्यक्तीचा आदर किंवा प्रतिष्ठा दर्शवण्यासाठी केली जाते. या मिठीत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं कौतुक किंवा प्रोत्साहन देण्याची भावना व्यक्त करतात. आपल्या गुरूला किंवा वरिष्ठ व्यक्तीला आदर व्यक्त करताना दिलेली मिठी. ह्याचा मुख्य हेतू त्या व्यक्तीला मान देणे, त्यांचा आदर व प्रेम दर्शवणे असतो.
दुःखाची मिठी:
दुःखाच्या वेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दिलेली मिठी ही समोरच्याला दिलासा देणारी असते. या मिठीचा अर्थ असा की, आपण समोरच्या व्यक्तीच्या दुःखात सहभागी आहोत. दुःखाच्या वेळी दिलेली मिठी एक प्रकारे एकाच वेळी सहानुभूती आणि प्रेम व्यक्त करते.उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या मित्राचे नुकसान होत असते, तेव्हा त्याला दिलेली मिठी ही भावनिक आधार देत असते.