प्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा, असं वाटत असतं. ग्लोइंग स्कीनसाठी अनेक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण चेहरा चांगला होण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाने मसाज केला पाहिजे; पण खरंच बर्फाचा मसाज फायदेशीर आहे का? यामुळे कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेऊयात.
[read_also content=”नोरा तर वाटतेय इजिप्तची राणी https://www.navarashtra.com/web-stories/nora-fatehi-bodysuit-and-fur-coat-photos-nrsr/”]
स्किनवर येतो ग्लो
रोज बर्फाने मसाज केल्यामुळे स्किनवर ग्लो येतो. स्कीन निरोगी आणि चमकदार दिसून येते. स्कीन केअरचा हा एक खूप चांगला पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमसुद्धा दूर होतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम असेल तर बर्फाचा मसाज करा. बर्फाचा मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते. मुरुमसुद्धा हळूहळू कमी होऊ शकतात.
डार्क सर्कल,रॅशेसपासून होईल सुटका
खूप जास्त स्क्रीन पाहणे, कमी झोप किंवा तणावामुळे डार्क सर्कल येतात. डोळ्याखाली येणारे हे डार्क सर्कल घालवण्यासाठी एकदा बर्फाचा वापर करून पाहा. बर्फ लावल्याने डार्क सर्कल कमी होतात आणि डोळ्याची सूजसुद्धा कमी होते. अनेकदा उन्हात गेल्यामुळे स्कीन कोरडी होते. तसेच स्कीनवर रॅशेज येतात, पण चेहऱ्यावर बर्फाचा मसाज केल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल आणि रॅशेसपासून आराम मिळेल.