नवी दिल्ली– उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच साथीच्या आजारांचेही. अशा स्थितीत जर घराबाहेर पडत असाल तर नक्कीच तुम्ही पाण्याची बाटली (Water Bottle) घेऊनच बाहेर पडत असणार. त्यातही तीच बाटली तुम्ही वारंवार वापरत असाल, आणि तोंड लावून पाणीही (Water) पित असाल. ही बाटली कित्येक जण तर रोज साफही (Clean) करत नसतील. याचमुळे ही बाटली आजारपणाचं निमंत्रण ठरु शकण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या बेफिकीरीमुळे तुमच्या पाण्याच्या बाटलीत बॅक्टेरिया जमा होतात. एकच बाटली जर तुम्ही वारंवार वापरत असाल तर त्यात टॉयलेट सीटपेक्षा 40 हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात, असं अमेरिकेतील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. ज्यांना वाटत असेल की घरातून पाणी बाटलीत भरुन नेल्यानं तुम्हाला बाहेरचे रोग होणार नाहीत, तर ते साफ चुकीचं ठरु शकतं. आता तुम्ही रोज बाटली स्वच्छ करुन भरत असाल असंही कारण दिलंत तरीही बाटलीत बॅक्टेरिया राहतातच, असंही हा रिसर्च सांगतोय.
काय आहे नेमकं या रिसर्चमध्ये
1. सातत्यानं वापरण्यात येणाऱ्य़ा बाटल्यांच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात आली.
2. बाटलीच्या बाहेरचा भाग, झाकण आणि बाटलीचं तोंड य़ाची तिनतिनदा तपासणी करण्यात आली.
3. बाटलीवर दोन प्रकारचे बॅक्टेरिया जमा होतात असं समोर आलं. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि बैसिलस बॅक्टेरिया असे हे दोन बॅक्टेरिया
4. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे अनेक प्रकारचे इन्पेक्शन्स होण्याची शक्यता
5. बेसिलसमुळे पोटाचे आणि गॅसचे विकार होण्याची शक्यता
6. या बाटल्यांची तुलना स्वयंपाकघारीतल इतर भांड्यांशी करण्यात आली. त्यात भांड्यांच्या रॅकपेक्षाही दुप्पट बॅक्टेरिया असल्याचं समोर आलं.
काय काळजी घ्याल
1बाटली वापरण्यापूर्वी वारंवार धुवून घ्या.
2. धुतल्यानंतर ती उन्हात ठेवा
3. बाटलीला येणारा वास जाईल यासाठी उपाययोजना करा
4.दिवसातून एकदा तरी बाटली साबण आणि गरम पाण्याने सॅनेटाईज करा
5. काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या लिंबानी आणि मिठानी धुवा
7. वापरायचीच असेल तर काचेच्या बाटलीला प्राधान्य द्या, मात्र ती सोबत नेणं अवघड आहे.
8. पाणी पिण्यासाठी वेगळा पेला असेल अशी बाटली सोबत ठेवा
बाटल्यांच्या बॅक्टेरियाचा कुणाला सर्वाधिक त्रास
1. ज्या व्यक्ती एन्टीबायोटिक्स घेतात त्यांच्यावर या औषधांचा परिणाम होत नाही.
2. पोटात गुडगुडणे, जळजळ, अपचनाचे त्रास
3. ह्रद्याचे विकार होण्याचीही शक्यता
4. अस्वस्थता येणे, उलट्या होण्याचीही शक्यता
5. लहान मुलींमध्ये वेळेआधीच हार्मोन बदलाची शक्यता
6. युरीन इन्फएक्शन होण्याचाही धोका
फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या बाटल्या या प्लॅस्टिकच्या असतात, त्यातून अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. फ्रिजमध्ये स्वस्त दर्जाच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरु नका, त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या आणि शक्यतो काचेच्या बाटल्यांचा वापर करा.
बाहेर विकत घेणाऱ्य़ा बाटल्यांचं काय
त्यातही बॅक्टेरिया असतात पण ते प्लास्टिकच्या बाटलीतले असतात. पाणी खराब होत नाही, मग त्या बाटल्यांवर असणारी एक्सपायरी डेट ही त्या प्लॅस्टिकची असते. अनेकदा ते प्लास्टिक पाण्यात मिसळण्याचा धोका असतो. बाजारात मिळणाऱ्या बाटल्या या एकदाच वापरुन फेकून द्यायच्या असतात.
बाटल्यांत कसे जातात बॅक्टेरिया
1. जेवताना उष्ट्या हाताने बाटलीला स्पर्श केल्यानं
2. तोंडाला बाटली लावून पिल्यानं लाळ जाते
3. खोकला किंवा शइंक आल्यास त्याच हातात बाटली घेतल्यानं
4. जास्त दिवस बाटलीत पाणी भरुन ठेवल्यानं
5. अस्वच्छ हातांनी बाटलीला स्पर्श केल्यानं






