भारतातील या राज्यांमध्ये साजरी केली जाते साऊदी अरब पद्धतीने ईद, जाणून घ्या त्यामागचं कारण (फोटो सौजन्य - istock )
ईद उल- फितर इस्लाम धर्माचा सगळ्यात महत्वपूर्ण सण आहे. ईदमुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. विशेषतः विविध ठिकाणी शेवया दुकाने सजवली जात आहेत. कानपुरीपासून पटणा आणि कोलकातापर्यंतच्या सुमारे एक डझन प्रकारच्या स्वादिष्ट शेवया दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. ईदमुळे इथे इतार-कॅप, कुर्ता पायजमा, कोहल इत्यादींच्या दुकानांमध्ये गर्दी असते.
पालकांनो! लहान मुलांच्या समोर चुकूनही करू नका ‘ही’ कामे; मानसिकतेवर होतो परिणाम
इस्लाममध्ये रमजान महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या पाक महिन्याच्या नंतर ईद साजरी केली जाते. ज्यात संपूर्ण मुसलमान रोजा ठेवतात. रमजान संपल्यानंतर इस्लामी कॅलेंडरनुसार दहावा महिना शव्वाल सुरु होतो आणि या महिन्याची सुरवात ईद- उल- फितर सणाने होते. यावर्षी भारतात २ मार्चला रमजानचा महिना सुरु झाला होता. या वर्षी ३१ मार्च किंवा १ एप्रिलला भारतात ईद साजरी करण्यात येणार आहे. कारण इस्लाममध्ये चंद्र दिसल्यावर ईदची तारीख ठरवण्यात येते. म्हणून जगातल्या विविध देशांमध्ये ईद वेगवेगळ्या दिवशी साजरी करण्यात येते. साधारणतः साऊदी अरब मध्ये भारताच्या एक दिवस आधी ईद साजरी करण्यात येते, या मागचा कारण भोगोलिक स्थिती आहे.
साऊदी अरबमध्ये ईद साजरी करण्यात आल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी भारतात ईद साजरी करण्यात येते. कारण साऊदी अरबमध्ये चंद्र पहिले दिसते. भारत आणि साऊदी अरबच्या वेळेत ४ तासाचा अंतर आहे. अधिक वेळेस भारतात ईदचा चंद्र एकाच दिवशी दिसतो आणि त्या नंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्यात येते. मात्र भारतात एक असा राज्य आहे. जो साऊदी अरब पद्धतीने ईद साजरा करतो. त्या राज्याचा नाव आहे केरळ.
या राज्यात साऊदी अरब नुसार ईद
केरळ मध्ये बाकी राज्यांपेक्षा एक दिवस आधी ईद- उल- फितर साजरी करण्यात येते. म्हणजेच साऊदी अरब सोबत इथे ईद साजरी करण्यात येते. याच्या मागे दोन कारणे आहे. पहिले कारण असे तो तटीय राज्य असल्यामुळे केरळच्या कॅलेंडर नुसार २९व्या दिवशी चंद्र दिसतो. बहुतेकदा ही तारीख साऊदी अरेबियाशी जुळते. दुसरा कारण हे कि केरळमध्ये मुस्लिम लोकांची संख्या जास्त आहे आणि इथले अनेक लोक साऊदी अरब मध्ये काम करतात. म्ह्णून येथील लोक साऊदी अरब सोबत ईद साजरी करतात.
मीठी ईद
ईद-उल-फितरला शेवया खाण्याची परंपरा आहे, म्हणूनच त्याला ‘मीठी ईद’ असेही म्हणतात. ईद उल-फितरच्या दिवशी, मुस्लिम बांधव सकाळची नमाज अदा करतात आणि एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात आणि मिठाई वाटली जाते. तसेच, ईदच्या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करण्याचे खूप महत्त्व आहे.