त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
हल्ली सर्वच स्त्रियांच्या चेहऱ्यावर पिंपल्स, टॅनिंग, फोड येतात. पण चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्स आणि इतर समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. सूर्यप्रकाश, अयोग्य आहार, पुरेसे पाणी न पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. खूप जास्त प्रमाणात जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि वारंवार तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरासोबतच त्वचेला सुद्धा हानी पोहचते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि फोड, टॅनिंग घालवण्यासाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करतात. तर काहीवेळा स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार केमिकल ट्रीटमेंट आणि पार्लरमध्ये जाऊन केलेल्या उपायांमुळे त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी केवळ महागड्या ट्रीटमेंट नाहीतर आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्वचेची वरून काळजी घेण्यासोबतच आतून काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारात खाल्लेल्या पौष्टिक पदार्थांचा शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा परिणाम दिसून येतो.
शरीरासोबतच त्वचेला सुद्धा जीवनसत्त्वे , खनिजे, आरोग्यदायी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता असते. यासाठी आहारात टोमॅटो, संत्री, शिमला मिरची, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी आणि किवी इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. आवश्यक प्रमाणात विटामिन सी चे सेवन केल्यास कोलेजन तयार होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी विटामिन सी आणि इतर आवश्यक गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करावे. बदाम आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटामिन ई मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
अक्रोड, चिया सीड्स आणि अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आढळून येतात. ज्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय संपूर्ण धान्यांमधून प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे शरीराला मिळतात. तसेच शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक आणि दूध इत्यादी थंड पदार्थांचे सेवन करावे. दुपारच्या जेवणानंतर नियमित ताक प्यायल्यास त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार होईल. याशिवाय आतड्यांचे आरोग्य सुद्धा कायमच सक्रिय राहण्यास मदत होईल. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ स्किन केअरच नाहीतर आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
Ans: फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, नट्स, बिया आणि पुरेसे पाणी यांचा संतुलित आहारात समावेश करावा. यामुळे शरीराला त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.
Ans: काही लोकांमध्ये संतुलित आहार, कमी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कमी साखरेचे सेवन त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकते. मात्र केवळ आहारामुळे पिंपल्स कायमचे नाहीसे होतील असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
Ans: पुरेसे पाणी पिणे शरीराचे हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करते. मात्र पाणी प्यायल्याने सुरकुत्या किंवा पिंपल्स थेट नाहीसे होतात, असे म्हणता येत नाही.






