आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा राष्ट्रीय सण. हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1947 साली याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामीतून भारताची सुटका झाली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या थोर व्यक्ती, सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, याच्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी देशवासियांना प्रत्येक घराघरात तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. 9 ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत सुरू असेल. यानिमित्त आम्ही तुम्हाला राष्ट्रध्वज फडकावणे आणि त्याचा वापर करण्याशी संबंधित नियम आणि कायदे सांगणार आहोत. हे माहिती तुम्हाला माहिती असायलाच हवेत अथवा यातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कठोर शिक्षा होऊ शकते.

राष्ट्रध्वजाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद राज्यघटनेत करण्यात आली आहे. यानुसार जर तुम्ही राष्ट्रध्वज उलटा चुकीच्या पद्धतीने आणि विकृत अवस्थेत फडकवताना आढळल्यास राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 2 मध्ये संविधान आणि राष्ट्रगीत यासारख्या भारतीय राष्ट्रीय चिन्हांचा अपमान रोखण्याच्या उद्देशाने शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार, दंड आणि तीन वर्षांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.






