देशाच्या सन्मानाचा आणि आनंदाचा दिवस अखेर जवळ आला आहे. देशभरात उद्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. हा दिवस देशाचा राष्ट्रीय सण म्हणून ओळखला जातो. याच दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि खऱ्या रीतीने सर्व बंधनांतून स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिशांच्या तावडीतून आपली सुटका केली आणि म्हणूनच हा दिवस आपण दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.
यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाही जय्यत तयारीला आता सुरुवात झाली आहे. देशभर या दिवशी झेंडा फडकावला जातो तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन नक्की 77 वा की 78 वा आहे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. चला तर मग याविषयी आणि 2024 च्या स्वातंत्र्य दिनाच्या थीमविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आणि 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. मागील वर्षामध्ये, भारताने स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला होता. यावेळी लोक संभ्रमात आहेत की, भारत यावर्षी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे की 78 वा. जर आपण स्वातंत्र्याच्या तारखेपासून म्हणजे 15 ऑगस्ट 1947 मोजले तर देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. यासह, भारत 2024 मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
हेदेखील वाचा – Independence Day 2024: भारतातील ‘या’ राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या
यावर्षी स्वातंत्र्यदिन 2024 ची अधिकृत थीम ‘विकसित भारत’ आहे. ही थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे. ही थीम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.