उन्हाळ्यात (Summer ) थंड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते. मे महिन्याला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. मे महिना चालू झाला की सगळीकडे तापमानात मोठी वाढ होते. तापमानात वाढ झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. ऊन वाढल्यानंतर हळूहळू शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे फार गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दिवसांतुन ६ ते ७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केला पाहिजे. थंड पदार्थ, ज्युस, स्मूदीचे तुम्ही तुमच्या आहारात सेवन करू शकता. स्मूदी पिल्याने पिल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. या दिवसांमध्ये उपलब्ध असलेल्या फळांपासून तुम्ही स्मूदी बनवू शकता. अशीच एक फळांच्या स्मूदीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी..
साहित्य:
१ पिकलेला आंबा
बर्फाचे तिकडे
अर्धा वाटी अननस
१ वाटी संत्र्याचा रस
सजवण्यासाठी आंबा
कृती:-
सर्वप्रथम आंबा अननस स्मूदी बनवण्यासाठी एक पिकलेला आंबा पाण्यात भिजत घालून ठेवा. १० मिनिट आंबा पाण्यात भिजत घालून ठेवल्यानंतर त्याची साल काढून आंब्याचा गर काढून घ्या. स्मूदी बनवण्यापूर्वी आंब्याचा गर आणि अननसाचे तुकडे फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या एका भांडयामध्ये अननसाचे तुकडे, आंब्याचा गर, बर्फाचे तुकडे, संत्र्याचा रस हे सर्व टाकून घ्या. त्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटून झाल्यावर तयार आहे आंबा अननस स्मूदी. तयार केलेली स्मूदी एका काचेच्या ग्लासमध्ये काढून लिंबाचे तुकडे आणि आंब्याचे तुकडे याने सजवून घ्या.






