नोकरदार महिलांनी 'अशा' प्रकारे घ्या आरोग्याची काळजी
धावपळीच्या जीवनात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जात. असे केल्याने आरोग्यसंबंधित अनेक गंभीर समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कामातून थोडा वेळ काढून आरोग्यकडे लक्ष दिले पाहिजे. नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला कामाच्या तणावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवनशैली जगणे फार गरजेचे आहे. आज जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागे काही खास करणे देखील आहेत. महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या नोकरदार महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
महिलांच्या जीवनशैलीत बदल झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.शरीरात होणारे हार्मोनल बदल, मानसिक तणाव, शारीरिक समस्या इत्यादींमुळे महिला पूर्णपणे खचून जातात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे लठ्ठपणा येणे, वाढत्या वयानंतर चयापचय मंदावणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांमुळे शरीर कमी प्रमाणात फॅट बर्न करू लागते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित 7 ते 8 तास झोपणे फार गरजेचे आहे. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीराला देखील काम करण्याची ऊर्जा मिळते. यामुळे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्याला फायदे होतात. त्यामुळे नियमित 7 ते 8 तास झोपले पाहिजे.
हे देखील वाचा: महिनाभर दैनंदिन रुटीनमध्ये नियमित करा ‘ही’ योगासने, आरोग्य राहील तंदुरुस्त
नोकरदार महिलांनी ‘अशा’ प्रकारे घ्या आरोग्याची काळजी
घर ऑफिस संभाळून तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांना अनेकदा शारीरिक थकवा जाणवू लागतात. दिवसभर सतत काम करत राहिल्याने शरीर पूर्णपणे थकून जाते. त्यामुळे काम करताना 20 सेकंड डोळे बंद करून शांत आराम करावा. जेणेकरून सतत दुखत होणारी पाठदुखी कमी होईल. वय वाढल्यानंतर चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. वाढत्या वयासोबत त्वचेमध्ये अनेक बदल जाणवू लागतात. सुरकुत्या येणे, वांग, पिंपल्स, मुरूम येणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर योग्य प्रकारे त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अन्यथा त्वचेवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी आधीच्या स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेला सूट होईल असे स्किन केअर वापरावे. कामाच्या तणावामुळे अनेक महिला मानसिक तणाव घेतात. यामुळे नैराश्य देखील येऊ लागते. अशा परिस्थिती तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबतही वेळ घालावा. जीवनशैली सुधारण्यासाठी आहारात शरीराला पौष्टिक असलेल्या पदार्थांचे सेवन करा. यामध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट, जीवनसत्त्वे आणि फायबरयुक्त अननपदार्थांचा समावेश करा.