कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा 'या' शक्तिशाली पदार्थांचा समावेश
आतड्यांचा कॅन्सर होण्याची कारणे?
आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे?
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खावे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकून जाते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आतडे शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या पन्नशीनंतर होणारा आजार तरुण वयात होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तरुण वयात शरीराला गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आतड्यांचा कॅन्सर हा शरीरसंबंधित अतिशय धोकादायक मानला जातो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे आणि आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही, ताक किंवा इतर थंड पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. जेवणानंतर दही खाण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे नियमित वाटीभर दही किंवा ताक प्यावे. यामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.
जेवणाची चव वाढवण्यासाठी आहारात लसुणचा समावेश केला जातो. जेवणाला लसूणची फोडणी दिल्याशिवाय चांगली चव लागत नाही. यामध्ये असलेले सल्फर घटक आणि फ्लेव्होनॉइड्स कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखतात. कॅन्सरचे जिवाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नियमित एक लसूण चावून खावा. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होत नाही.
Ans: फायबरयुक्त फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, बिया आणि सुकामेवा यांचा संतुलित आहारात समावेश करणे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
Ans: फायबरयुक्त आहाराचा नियमित समावेश कोलोरेक्टल कॅन्सरच्या कमी जोखमीशी संबंधित असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. मात्र कोणताही एक पदार्थ कॅन्सर होण्यापासून पूर्णपणे रोखू शकत नाही.
Ans: डाळी, कडधान्ये, ओट्स, संपूर्ण धान्ये, हिरव्या भाज्या, फळे आणि इतर नैसर्गिक फायबरयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात घेता येतात.






