ईशा अंबानीचे संगीत सोहळ्यासाठी ग्लॅमरस लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ईशा अंबानी म्हणजे स्टाईल आयकॉन. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यात तिने एकूण तीन लुक केले होते आणि हे तिन्ही लुक कमालीचे आकर्षक असून वेगळ्याच स्टाईल स्टेटमेंटमध्ये ईशा अंबानी दिसून आली आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सर्व हिरॉईन्सवर ईशाची स्टाईल अधिक भारी ठरल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या हिरॉईनच्या सौंदर्याला फिके पाडेल असे ईशाचे स्टाईल स्टेटमेंट यावेळी दिसून आले. ईशा नेहमीच सुंदर दिसते मात्र यावेळी तिने अधिक ग्लॅमरस लुकला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. कसे आहेत तिचे हे आऊटफिट्स आणि फॅशन स्टाईल जाणून घ्या. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
पेस्टल पिंक लेहंगा
ईशाचा इंडियन अटायर ग्लॅम लुक
ईशाने यावेळी पेस्टल पिंक अँड सिल्व्हर वर्क असणारा डिझाईन फाल्गुनी आणि शेन पिकॉकचा लेहंगा परिधान केला असून हा अत्यंत क्लासी आणि एलिंगट दिसून येत आहे. यावर संपूर्ण शिमरी आणि ग्लॉसी वर्क करण्यात आले असून अत्यंत बारीक कलाकुसर करण्यात आली आहे. तर ईशाने अत्यंत रॉयल पद्धतीने हा लेहंगा कॅरी केलाय
ब्रालेट शिमरी टॉप आणि स्कर्ट
बॉलीवूड स्टाईल ग्लॅम लुक
आधुनिक भारतीय महिलांच्या स्टाईलसाठी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला हा ब्रालेट शिमरी टॉप आणि स्कर्ट सेट योग्य कॉउचर लुक आहे. यात चमकणारे हिरवे आणि चांदीचे क्रिस्टल, मिरर आणि सिक्विन वर्क करण्यात आले असून यात नेकलाइनवर कट-आउट, फिट केलेले बस्ट आणि क्रॉप केलेले सिल्हूदेखील देण्यात आले आहे. ईशाचा हा लुक कमालीचा ग्लॅमरस दिसून येत आहे. एखाद्या फिल्मी गाण्यासाठी लुक असावा तशी ईशा दिसतेय.
ईशाची शियापरेली साडी
शियापरेली साडीतील ईशाचा ग्लॅम लुक
ईशा अंबानीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभासाठी Schiaparelli ने डिझाइन केलेली पहिली-वहिली कस्टम साडी नेसली होती. डाएट सब्यानुसार, ईशाची साडी ही डॅनियल रोजबेरीने डिझाईन केलेली शियापरेलीची ‘मॉडर्न डे’ साडी आहे. दरम्यान, पहिली शियापरेली साडी मूळतः 1935 मध्ये कपूरथला येथील राणी सीता देवी यांच्याकडून प्रेरित होऊन निर्माण करण्यात आली होती, जिला पश्चिम बंगालमध्ये प्रिन्सेस करम म्हणून ओळखले जात असे.
ईशाचे दागिने
ईशाने घातलेले विविध दागिन्यांचा लुक
ईशाने प्रत्येक ड्रेसनुसार दागिन्यांची निवड केल्याचे दिसून येत आहे. लेहंग्यावर तिने पाचूचा चोकर आणि मोठे पाचूचे कानातले परिधान केले असून हातात तिने हिऱ्याच्या बांगड्या घातल्या आहेत. तर काऊचर लुकमध्ये तिने संपूर्ण हिऱ्याचे दागिने परिधान केले असून वेगळ्या स्टाईलचा मांगटिका, हिऱ्याचे टॉप्स, गळ्यात नेकलेस परिधान केलाय. तर ग्लॅमरस ब्रालेट ड्रेससह तिने पाचूचे दागिने तसेच ठेवले आहेत आणि क्लासी लुक सर्वांसमोर आणलाय.
ईशाचा ग्लॅमरस मेकअप
ग्लॉसी आणि ग्लॅम मेकअप
ईशाने लेहंग्य़ासह सॉफ्ट मेकअप लुक ठेवला असून ग्लॉसी पिंक लिपस्टिक कॅरी केली आहे. मात्र तिने अन्य दोन्ही लुक्समध्ये अधिक ग्लॅम मेकअप केल्याचे दिसून येत आहे. ट्विस्टेट बनसह स्मोकी आयशॅडो, विंग्ड आयलायनर, कोहल लाईन्ड आईज, कोरलेल्या जाडसर भुवया, मस्कारा, आयलॅशेस, बेरी लिप शेड, हायलायरचा वापर करून पूर्ण ग्लॅम लुक सर्वांच्या हृदयाचा ठाव घेताना दिसतोय.