Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Silent Village : तुम्हाला माहिती आहे का? देशात एक असे गाव देखील आहे जे 'सायलंट व्हिलेज' या नावाने ओळखले जाते. या नावामागे एक खास कारण जोडलेले आहे जे तुम्हाला थक्क करु शकते. चला या नावामागचे कारण आणि हे गाव नक्की कुठे वसलंय ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 08:14 AM
भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Follow Us
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरमधील हे दुर्गम गाव आपल्या अनोख्या ओळखीमुळे चर्चेत आहे.
  • गावाबाबत अनेक वर्षांपासून संशोधन सुरू असून तज्ज्ञांनीही याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
  • स्थानिकांमध्ये यामागे वैज्ञानिक कारणांसोबतच एक वेगळी लोकमान्यताही प्रचलित आहे.
भारतातील गावांना तेथील नैसर्गिक सुंदरता, शांतता आणि संस्कृतीमुळे खास करुन ओळखले जाते. हिरवेगार शेत आणि मातीचा सुगंध कुणाला मोहित करत नाही. डोंगरांवर वसलेले लहान गाव आणि तेथील सुंदर दृष्ये एक वेगळाच अनुभव देऊन जातात. सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट आणि रात्री आकाशात चमकणारे तारे हे सर्वच तुम्हाला शहरात नाही अनुभवता येणार, तर त्यासाठी तुम्हाला गावाकडेच जावं लागेल.

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा गावाची माहिती सांगत आहोत ज्याला सायलंट व्हिलेजच्या नावाने ओळखले जाते. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी काही खासियत असते पण या गावाला असं नाव का मिळालं यामागच कारण आपण जाणून घेणार आहोत. काही वेगळा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही या गावाला नक्कीच भेट देऊ शकता. चला हे गाव नक्की कुठे आहे आणि त्याच्या नावामागची कहाणी काय ते सविस्तर जाणून घेऊया.

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये वसलंय गाव

या सायलंट व्हिलेजचे खरे नाव डडकई असे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदोह तहसीलच्या भासेला परिसरात डोंगरांमध्ये ते वसले आहे. गावाच्या चारही बाजूने उंच हिरवेगार डोंगर आहेत. हेच कारण आहे की इथले नैसर्गिक साैंदर्य अनेक पर्यटकांना या ठिकाणाकडे आकर्षित करते. भद्रवाहपासून किमान १०५ किमी अंतरावर वसलेल्या या गावाला मिनी काश्मिर देखील म्हटले जाते.

गावाला सायलंट व्हिलेज नाव का पडलं?

गावाला मिळालेल्या अनोख्या नावामुळेच देशभरात याची एक वेगळी ओळख तयार झाली आहे. खरंतर या गावात राहणारे लोक ऐकू किंवा बोलू शकत नाही. हेच कारण आहे की गावातील मुलांमध्येही ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. येथे जन्मलेली मुले सामान्यतः कर्णबधिर आणि मुकी असतात. इथे लोक एकमेकांसोबत हावभावांनी संभाषण करतात. सांगितलं जातं की, या समस्येची पहिली नोंद १९०१ साली झाली. कालांतराने ही समस्या केवळ वाढतच गेली आहे.

Travel News : भारतीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन… इथून काहीच पावलांवर सुरू होते दुसऱ्या देशाची वाट

तज्ञांचे मत काय?

तज्ञांनुसार, गावातील लोकांमध्ये आढळणाऱ्या अनुवांशिक कारणांमुळे त्यांना या समस्येचा त्रास पिढ्यानपिढ्या सतावत आहे. याचे मूळ कारण एकाच समाजात किंवा नातेवाईकांमध्येच मोठ्या प्रमाणात होणारे विवाह आहे. आई-वडिलांचे जनुके (Genes) खूप समान असल्याने मुलांमध्ये दुर्मिळ आनुवंशिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि म्हणूनच या गावात बहुतांश लोक मुके आणि कर्णबधिर आहेत. दुसरीकडे, गावातील काही लोक याला एक शाप मानतात.

 

Web Title: Jammu kashmir dhadkai is known as silent village travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’
4

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.