
Health Tips: लॅपटॉपवर काम करून शरीर पोखरतंय? Work From Home करणाऱ्यांमध्ये वाढतोय ‘या’ आजारांचा धोका
तज्ज्ञांच्या मते, जीऱ्याचे पाणी पचनासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मानले जाते. हे पाचक एन्झाइम्स वाढवून अन्न पचण्यास मदत करते. ज्यांना वारंवार पोट फुगणे, गॅस किंवा जडपणाची समस्या असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी जीऱ्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. रात्री पाण्यात भिजवलेले जीरे सकाळी गाळून पिल्यास अधिक फायदा मिळतो.
ओव्यात ‘थायमोल’ नावाचे सक्रिय घटक असतात, जे अपचन आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, मात्र हे पाणी खूप प्रभावी असल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा गॅस्ट्रायटिस असलेल्या लोकांनी याचे नियमित सेवन टाळावे. तसेच, गर्भवती महिलांनी देखील ओव्याचे पाणी टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाण्याचे सेवन करावे.
मेथीचे पाणी मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. मेथीच्या दाण्यातील सॉल्युबल फायबर कार्बोहायड्रेटचे शोषण कमी करण्यास मदत करते. प्री-डायबिटीज किंवा टाइप-२ डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी हे फायदेशीर असू शकते. तसेच बद्धकोष्ठता आणि सुस्त पचन असलेल्या लोकांनाही याचा फायदा होतो. मात्र अति सेवन केल्यास अतिसार होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, ही पेये कोणताही जादुई उपाय नाहीत. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैलीसोबतच या ड्रिंक्सचा उपयोग होऊ शकतो. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या पेयांचा नियमित वापर करावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता