शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय!
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला कायमच वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट आणि बॉडी ट्रीटमेंट करून घेतात. महिला प्रामुख्याने ब्रेस्ट इम्प्लांट्ससारख्या सर्जरी करून घेतात. या सर्जरीमध्ये स्तनांची पुनर्बांधणी करून स्तनाच्या ऊतीखाली किंवा छातीच्या स्नायूखाली बसवले जातात. पण कालांतराने शरीरात अनेक भयानक बदल आणि वेदना जाणवू लागतात. या वेदना काहीवेळा खूप जास्त असह्य असतात. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा कायमच तिच्या अभिनय, बोल्ड लुक्स आणि बिनधास्त, बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकताच शालिनीने घेतलेल्या निर्णयामुळे ती पुन्हा एकदा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शर्लिनने आपले ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकणार आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेआधी शर्लिनने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. शर्लिनने घेतलेला ब्रेस्ट इम्प्लाण्ट काढण्याचा निर्णय ऐकून चाहत्यांसाठी आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. आज आम्ही तुम्हाला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्यानंतर चेचा पोत, स्तनांचा आकार आणि शरीरात कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला एक्सप्लांटेशन असे म्हणतात. ही प्रक्रिया सुरक्षित असली तरीसुद्धा याचे शरीरावर दीर्घकाळ आणि तात्काळ परिणाम दिसून येतात. सर्जरी केल्यामुळे स्तनांची त्वचा आणि ऊती ताणल्या जातात.पण एक्सप्लांटेशन प्रक्रिया झाल्यानंतर स्तनांचा आकार कमी होतो. ताणलेली त्वचा लवकर आकुंचन होत नाही. ज्यामुळे स्तन सैल किंवा ओघळण्यासारखी दिसू लागते. ब्रेस्ट इम्प्लांट्स करण्याआधीचा स्तनांचा आकार एक्सप्लांटेशन केल्यानंतर खूप जास्त वेगळा दिसतो. यामागील महत्वपूर्ण कारण म्हणजे स्तनाच्या नैसर्गिक ऊतींचा आकार कमी केलेला असतो. यामुळे काहीवेळा त्वचा खूप जास्त सुरकुत्यासारखी वाटते.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही आठवड्यांपर्यंत स्तनामध्ये खूप जास्त वेदना आणि सूज येण्याची शक्यता असते. याशिवाय शस्त्रक्रियेच्या जागी संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर आरोग्याची खूप जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्जरीनंतर छातीत वेदना, सूज आणि ताण जाणवण्याची शक्यता असते. या वेदना काहीवेळा दीर्घकाळ टिकून राहतात.
इम्प्लांट काहीवेळा सरकण्याची शक्यता असते, ज्यामुळे दोन्ही स्तनांचा आकार वेगवेगळा दिसू लागतो. काही महिलांमध्ये इम्प्लांट्स बसवल्यानंतर संधिवात, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि विस्मरण यांसारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. एक्सप्लांटेशन सर्जरी केल्यानंतर स्तनांचा आकार बदलण्याची जास्त शक्यता असते.
Ans: ब्रेस्ट इम्प्लांट ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये सिलिकॉन किंवा सलाइनचे इम्प्लांट वापरून स्तनांचा आकार आणि आकार वाढवला जातो.
Ans: सर्जन छातीच्या ऊती आणि स्नायूंच्या दरम्यान एक कप्पा तयार करतो. इम्प्लांट नंतर या कप्प्यात ठेवला जातो.
Ans: मुख्यतः सिलिकॉन आणि सलाइन इम्प्लांट वापरले जातात.






