पावसाळ्यात ओलावा खूप असल्यामुळे अनेकदा केस ओले राहतात. ओले राहिलेले केस हे केसगळतीस खूप कारणीभूत असतात. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्याला केसांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे केसगळती खूप वाढते. अनेकदा नुसते केस हातात घेतली तरी गळतात. त्यामुळेच योग्य ती काळजी आपण घेतली तर पावसाळ्यातही केसांचे आरोग्य आपण उत्तम ठेवू शकतो. खासकरून घरगुती उपयांचा वापर करून आपण घरात काही मास्क बनवू शकतो. जे डोक्यावरील त्वचेलाही पोषक असेच आहेत. पावसाळ्यात केस निट सुकवा, केस न सुकवल्यास कोंड, उवा हे होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात केसांना तेल लावा, तेल लावताना ते थोडेसे कोमट लावावे.
ऑलिव्ह ऑईलमध्ये फॅटीसिड असतात जे केसांना मॉइश्चराइज करण्याचे काम करतात. दहीमध्ये लैक्टिक असते, यामुळे मृत त्वचा गळून पडते. तसेच केसांचा मास्क तयार करण्यासाठी, अर्धा कप दही, २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळावे लागेल. हा हेअर मास्क केसांवर लावा आणि सुमारे २० ते ३० मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा. मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जो कोरडेपणा काढून केसांना मऊ करण्यास मदत करते. अंड्यांमध्ये अमीनो असिड्स असतात जे केसगळती कमी करतात. या दोन गोष्टींचे योग्य मिश्रण झाल्यावर केसांना चकाकी प्राप्त होते. याकरता तुम्हाला एक अंडे आणि एक चमचा मध मिक्स करावे लागेल. हा मास्क सुमारे एक तास केसांवर ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.