अनेकांना झोपताना मोबाईल आपल्या उशीजवळ किंवा पलंगावर घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय धोकादायक ठरू शकते. मोबाईल उशापाशी घेऊन झोपल्याने तुमची तब्येतच बिघडत नाही तर यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याविषयी माहिती दिली आहे. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड खराब असण्याचं कारण मोबाईलचे रेडिएशन (Mobile Radiation) असू शकतात. (Cancer)
मोबाईल रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका?
तुम्ही झोपताना मोबाईल उशापाशी ठेवून स्वत:चं नुकसान करत आहात. डोकेदुखी, स्नायूदुखी आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे मूळ कारण मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहे. मोबाईलच्या रेडिएशनमुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मोबाईलमधील रेडिएशनमुळे तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनचेही बळी ठरू शकता. त्यातील रेडिएशनचा बॉडी क्लॉकवरही परिणाम होतो. या सामान्य समस्या आहेत. पण जागितक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, मोबाईलमधून बाहेर पडणारे विशेष प्रकारचे रेडिएशन, ज्याला आरएफ रेडिएशन असे म्हणतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवत असाल तर काळजी घ्या.
झोपताना मोबाईल किती दूर ठेवाल?
जर तुम्हाला झोपताना मोबाईल बेडवर ठेवायचा नाही तर तो आपल्यापासून किती दूर ठेवायाचा असा प्रश्न पडला असेल. तर त्या प्रश्नाचंही उत्तर तज्ञांनी दिलं आहे. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा मोबाईल तुमच्यापासून किमान तीन फूट दूर ठेवा, असा तज्ञांचा सल्ला आहे. यामुळे तुम्ही मोबाईलच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फील्ड आणि धोकादायक रेडिएशनपासून दूर राहील.