नवीन वर्षाच्या स्वागताला काही दिवसांचाच अवधी उरला आहे. अनेकांना नव वर्ष कसं असले याची उत्सुकता लागली आहे. तर काहीना हे जाणीन घेयचं आहे की येणारे नवीन वर्ष हे कसे असेल त्यामधील एक भाग सांगणार आहे. ते म्हणजे कोणच्या राशीला येणार यश तर कोणाच्या राशीला दोष.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी प्रेम प्रकरणांसाठी हे वर्ष खूप चांगले असेल. यावर्षी या राशीच्या व्यक्ती तुमच्या जोडीदारासोबत आवडत्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता आणि एकत्र चांगला वेळ घालवू शकता. यामुळे नात्यात गोडवा निर्माण होईल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही विवाहित असाल, तर या वर्षी नात्यात तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळतील, प्रेमात असलेल्यांबद्दल प्रयत्न केल्यास यश मिळू शकते.
वृषभ
नवीन वर्षात तुम्हाला पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या नात्याबद्दल खूप गंभीर असाल. प्रेमाबद्दल मनात ठेवण्यापेक्षा ते समोरच्या व्यक्तीला सांगितल्यास यश मिळू शकते.
मिथुन
या राशीसाठी नवीन वर्षाचा सुरूवातीचा काळा लव्ह लाईफसाठी काही खास असणार नाही. यामुळे तुम्हाला सगळं थांबल्या सारखं वाटेल. प्रेयसिला समजून घेण्यासाठी या राशीच्या मुलांना बरेच प्रयत्न करावे लागतील. ज्या व्यक्ती प्रेमसांभाळू शकत नाहीत अशांचा ब्रेकअप होऊ शकतो. त्यामुळे प्रेमात सावधतेने पावलं उचला.
कर्क
नव वर्षाची सुरूवात या राशीच्या व्यक्तींसाठी खूप चांगली असेल. यावर्षी तुम्ही लग्नासाठी विशेष प्रयत्न कराल. परंतु यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण घाईत केलेल्या गोष्टी कधी धोक्याच्या ठरू शकतात.
सिंह
या वर्षाच्या मध्यात या राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीशी लग्न करण्याचा योग येऊ शकतो. वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत तुमचे प्रेम जीवन खूप चांगले असेल आणि तुमच्या आयुष्यात प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. यावर्षी आनंदाला सीमा राहणार नाही.
कन्या
प्रिय व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतील. मार्च ते मे दरम्यान प्रपोज केल्यास यश मिळू शकते. आनंदी जीवनासाठी वर्षाचे शेवटचे दोन महिने चांगले असतील. जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असतील तर, तुमचे नाते अधिक दृढ होईल.
तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन वर्ष सामान्य असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराशी लग्नाबद्दल बोलू शकता, परंतु या वर्षी लग्न करण्यात अनेक अडचणी येतील. यावर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि प्रियकराला समान वेळ देऊन नातं मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक
प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींचे आयुष्य खूप चांगले असेल. वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमचे लग्न होण्याची शक्यता आहे. हे वर्ष भरपूर प्रेम देणारे असेल. तुमचे कुटुंबीय देखील तुमच्या प्रेम संबंधाला सहमती देतील.
धनु
नवीन वर्षाचा मध्य आणि नंतरचा काळ चांगला जाण्याचे संकेत आहेत. प्रेमात अनेक चढ-उतार पाहण्यास मदत होईल. प्रिय व्यक्तीला अनेक आश्वासने दिली जातील. मात्र, ती पूर्ण न झाल्याने नात्यात कटूता निर्माण होईल. चुकांची माफी मागितल्यास लग्नाचा विषय मार्गी लागू शकतो.
मकर
या वर्षी मेष राशीच्या व्यक्ती प्रेम आणि नाते अधिक सुंदर बनवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. यावर्षी प्रियकराला किंवा प्रेयसिला प्रपोज केल्यास फायदा होऊ शकतो. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या नात्यात काही तणाव वाढू शकतो.
कुंभ
ज्या व्यक्ती प्रेमात आहेत त्यांच्या जीवनात अधिक प्रेम पहायला मिळेल, एकमेकांच्या जवळ येण्याने नाते आणखी घट्ट होईल. प्रिय व्यक्तीला प्रपोज केल्यास यश नक्की मिळेल. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शुल्लक गोष्टीवरून प्रियकराशी भांडण होऊ शकतात,
मीन
या वर्षाच्या मध्यात अशा काही परिस्थिती निर्माण होतील येतील ज्यामुळे प्रेमात संयम बाळगावा लागेल. प्रियकराच्या चांगुलपणाने प्रेरित होऊन तुम्ही प्रेमात अखंड बुडून जाल.