रक्तवाहिन्या (Blood Vessels) किंवा रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहण्यापासून रोखतात, तेव्हा रक्ताची गुठळी होणे एक समस्या बनते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची चिन्हे आणि लक्षणे (Signs and Symptoms) त्यांच्या धमनी किंवा शिरांमध्ये उद्भवू शकतात की नाही, यावर त्यांचे स्थान अवलंबून असते. हृदय किंवा मेंदूला रक्त पुरवणार्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.
सामान्य लक्षणांमध्ये सूज, तीव्र वेदना, कळ येणे, शरीराच्या काही भागांचा अर्धांगवायू यांचा समावेश आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकदेखील येऊ शकतो. म्हणूनच आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळी तयार झाल्या आहेत किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लठ्ठपणा, धूम्रपान, बैठे काम, शारीरिक हालचालींचा अभाव, लांब अंतराचा हवाई प्रवास, अशी काही सामान्य कारणे आहेत, ज्यामुळे रक्तातील गुठळ्या होऊ शकतात. म्हणूनच या आजाराची लक्षणे दिसून आल्यास उशीर न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रक्तातील गुठळ्या धोकादायक असतात. कारण, शरीराच्या विशिष्ट भागात जेथे रक्त विकसित होते, तेथे यामुळे रक्ताचा नियमित प्रवाह रोखला जाऊ शकतो. यामुळे अडथळे येतात आणि शेवटी ऊतींमध्ये ऑक्सिजनची कमतरता येते, ज्यामुळे ऊतींचे नुकसान होते. रक्तवाहिनीत रक्त साकळणे ही एक शिरासंबंधीची समस्या आहे, जी कालांतराने निरंतर तयार होते. परंतु तरीही ती जीवघेणी असू शकते. रक्ताची गुठळी पाय किंवा हात, हृदय, उदर, मेंदू आणि फुप्फुसांमध्ये विकसित होऊ शकते.
रक्ताच्या गुठळ्या सामान्यत: अशा लोकांमध्ये आढळतात, ज्यांना काही विशिष्ट शारीरिक आजार आहेत, ज्या व्यक्तींचे शारीरिक हालचालींचे प्रमाण खूप कमी असते. एखादी दुखापत झाली आहे किंवा शस्त्रक्रिया झाली आहे किंवा काही रोग असल्यास रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. शरीराच्या खोल नसांमध्ये रक्तातील गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.