Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचे सेवन करता! तर वेळीच थांबा, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे

शरीरातील कमी झालेले कॅल्शियम किंवा इतर पोषक घटक वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचा आधार घेतला जातो.डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या जातात. पण अनेकदा या गोळ्या अतिप्रमाणात घेतल्यामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील कमी झालेली ताकद वेगाने वाढण्यासाठी या गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन केले जाते. त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2024 | 01:37 PM
मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे

मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. आरोग्य बिघडल्यानंतर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. शरीरात पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर सतत चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे, उलट्या होणे, काम करण्याची इच्छा न होणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. अशावेळी शरीरातील कमी झालेले कॅल्शियम किंवा इतर पोषक घटक वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांचा आधार घेतला जातो.डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्या खाल्ल्यानंतर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. मल्टीविटॅमिन्स किंवा सपलिमेंट औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

बाजारामध्ये विटामिन, सोडियम, झिंक, मॅग्नेशियम, आयोडीन आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत. या गोळ्या खाल्ल्यानंतर केस, त्वचा, नख, हाडांमधील वेदना, स्नायूंचे दुखणे, संधिवात इत्यादी अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. पण अतिप्रमाणात मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर हळूहळू परिणाम दिसू लागतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: मोड आलेल्या मुगाचे 6 जबरदस्त फायदे, लठ्ठपणा-डायबिटीसपासून मुक्ती मिळून बांधा होईल सुडौल

मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे:

  • धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. अशावेळी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आहारातील कमतरता भरून काढण्याचे काम करतात,ज्यामुळे शरीरात अशक्तपणा किंवा इतर समस्या जाणवत नाहीत.
  • शरीरात निर्माण झालेली जीवनसत्वे आणि पोषक घटकांची कमतरता भरून आरोग्य सुधारण्याचे काम करतात.
  • मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांमध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी मोठ्या प्रमाणावर असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य मजबूत होते. तसेच शरीरात ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी मदत होते.
  • गर्भधारणेपूर्वी आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या जातात.
  • मासिक पाळीतील वेदना आणि अशक्तपणापासून शरीराचा बचाव करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या जातात.
  • बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीराला आवश्यक असलेल्या गोळ्या घ्याव्यात.
हे देखील वाचा: नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 5 व्यायाम, गायनोकॉलॉजिस्टने सांगितले रिकव्हरी होईल सोपी

मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि तोटे

मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

  • रिकाम्या पोटी मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे रिकाम्या पोटी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ नये.
  • मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार न घेता अतिप्रमाणात घेतल्यामुळे किडनी आणि लिव्हर फेल होण्याची शक्यता असते.
  • शरीरातील कमी झालेली शक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्या जातात, पण या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा होऊ शकते.
  • मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेताना आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिले नाहीतर गोळ्यांचा शरीरावर कोणताच परिणाम दिसून येणार नाही.
  • केमोथेरपी, रक्त पातळ करण्यासाठी घेतलेली औषध, कर्करोग इत्यादी गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेऊ नये. या गोळ्या घेतल्याने आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते.
 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Know the health benefits and disadvantages of multivitamin pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 01:37 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल
1

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

तरुणांमध्ये का वाढतोय मूळव्याधीचा आजार? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
3

तरुणांमध्ये का वाढतोय मूळव्याधीचा आजार? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका
4

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.