Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी

Thyroid Controlling Foods: थायरॉईडच्या रुग्णांनी दररोजच्या आहारात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 07:19 PM
Thyroid:  थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी
Follow Us
Follow Us:
  • थायरॉईडच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाव्यात?
  • ब्रोकोली आणि कोबी खरंच हानिकारक?
  • जंक फूडपासून राहा लांब
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थायरॉईडची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. शरीरातील ही लहान ग्रंथी (मेटबॉलिजम रेट) चयापचय, शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके, मनःस्थिती आणि ऊर्जा नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे थायरॉईडचे संतुलन बिघडल्यास संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, औषधांसोबत योग्य आहार घेतल्यास थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते. थायरॉईड कंट्रोल करण्यासाठी रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाव्यात अन् कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, जाणून घ्या.

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम

आयोडीन, सेलेनियम आणि झिंक का महत्त्वाचे?

थायरॉईडसाठी आयोडीन अत्यंत आवश्यक आहे. हे पोषक तत्व थायरॉईड हार्मोन्स तयार करण्यास मदत करते. आयोडीनच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे असंतुलन आणि थायरॉईड ग्रंथीची वाढ होऊ शकते. आयोडीनयुक्त मीठ, दूध, अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ हे आयोडीनचे चांगले स्रोत मानले जातात. याशिवाय सेलेनियम आणि झिंकही थायरॉईडसाठी फायदेशीर आहेत. सेलेनियम हार्मोन्स सक्रिय करण्यास मदत करते, तर झिंक हार्मोन निर्मितीसाठी आवश्यक असते. अंडी, कडधान्ये, बिया, सुकामेवा आणि संपूर्ण धान्ये या पोषक घटकांची कमतरता भरून काढू शकतात.

ब्रोकोली आणि कोबी खरंच हानिकारक आहेत का?

सोशल मीडियावर ब्रोकोली, कोबी आणि फुलकोबी या भाज्या थायरॉईडसाठी घातक असल्याचा दावा केला जातो. मात्र तज्ज्ञांच्या मते, या भाज्या योग्य प्रकारे शिजवून आणि माफक प्रमाणात खाल्ल्यास कोणतीही हानी होत नाही. उलट त्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

जंक फूडपासून लांब राहा

तज्ज्ञांच्या मते, प्रक्रिया केलेले आणि जंक फूड ही खरी समस्या आहे. जास्त तळलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि प्रोसेस्ड फूड सूजन, वजन वाढ आणि थकवा वाढवू शकते. त्यामुळे थायरॉईडची लक्षणे अधिक गंभीर होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. थायरॉईडसाठी कोणताही चमत्कारिक आहार नाही. संतुलित आहार, ताजे घरगुती अन्न, मर्यादित आयोडीनयुक्त मीठ आणि योग्य वेळी औषधे घेणे हेच थायरॉईड नियंत्रणात ठेवण्याचे सर्वोत्तम उपाय आहेत. याशिवाय, दररोज नियमित व्यायाम किंवा योगा करण्याचा प्रयत्न करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नैसर्गिक सुंदरता, शांतता अन् नाइटलाइफचा परफेक्ट संगम; भारतातील ‘ही’ नयनरम्य ठिकाणं पिकनिकसाठी ठरतील बेस्ट

Web Title: Thyroid diet foods to eat and avoid health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • thyroid care

संबंधित बातम्या

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
1

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
2

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
3

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
4

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.