Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणासोबत फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे, अन्यथा उद्भवतील आतड्यांसंबंधित आजार

उपाशी पोटी किंवा चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे सेवन कायमच सकाळच्या नाश्त्यात करावे. यामुळे खाल्लेले पदार्थ सहज पचन होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 21, 2025 | 01:02 PM
जेवणासोबत फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे

जेवणासोबत फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या आयुर्वेदानुसार कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे

Follow Us
Follow Us:

फळे खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे?
चुकीच्या वेळी फळे खाल्ल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम?

आयुर्वेदात दीर्घकाळ हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी अनेक सल्ले देण्यात आले आहेत. पौष्टीक पदार्थांच्या सेवनासोबतच नियमित फळे खाल्ल्यास तुम्ही कायमच फ्रेश आणि ताजेतवटीत राहाल. निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन केले जाते. पण फळांचे सेवन योग्य वेळी न केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. फळे शरीरासाठी उत्तम मानली जातात. पण चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे आतड्या आणि पोटाचे विकार होतात. यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे? चुकीच्या वेळी फळे खाल्ल्यास शरीरावर कोणते परिणाम होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

२०५ औषधांचे नमुने अयशवस्वी! खोकला- ताप, हृदयरोगाच्या असंख्य औषधांचा समावेश, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोळ्या

जेवणासोबत किंवा जेवणानंतर फळे खाण्याचे तोटे:

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, जेवणानंतर किंवा जेवणासोबत फळे खाल्ल्यास ती लवकर पचन होत नाहीत. कारण मुख्य अन्नपदार्थांचे पचन होत असते. खाल्लेले अन्नपदार्थ किंवा फळे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये अन्नपदार्थांचे विषारी कण तसेच साचून राहतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढून शरीराला हानी पोहचते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होण्यास सुरुवात होते. पोटातील ॲसिडच्या निर्मितीवर परिणाम झाल्यानंतर जळजळ आणि अस्वस्थता वाढते.

फाके खाण्याची योग्य वेळ कोणती:

कोणत्याही फळांचे सेवन सकाळी किंवा सकाळच्या नाश्त्यात करावे. सकाळच्या नाश्त्यात फळे खाल्ल्यास पोट भरलेले राहते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळांचे सेवन केल्यास ते सहज पचन होतात. पण रिकाम्या पोटी आंबट फळांचे अजिबात सेवन करू नये. आंबट फळांचे सेवन केल्यामुळे अपचन किंवाऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी तुम्ही सफरचंद, केळी किंवा पपई सारखी फळे खाऊ शकता.

आयुर्वेदामध्ये कायमच ताजी आणि चांगली फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. ताज्या फळांचे सेवन केल्यास महिनाभरात चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल. तसेच फळांचे सेवन कधीही दूध, दही किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत करू नये. कारण फळांचे आणि इतर पदार्थांचे स्वरूप वेगवेगळे असते. फळांमधील घटक शरीरात मिक्स झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यात स्ट्रॉबेरीसारख्या आंबट फळांचे सेवन अजिबात करू नये.

मासिक पाळी येण्याआधी महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ गंभीर संकेत, शारीरिक समस्यांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

ऋतूंनुसार करा फळांची निवड:

दिवसभरातून एकदातरी फळांचे सेवन करावे. संध्याकाळच्या वेळी कोणतीही फळे खाऊ नये. यामुळे फळे व्यवस्थित पचन होत नाहीत. फ्रिजमध्ये शिळी किंवा कापून ठेवलेली फळे अजिबात खाऊ नये. कापून ठेवलेली फळे काळी झाल्यानंतर त्यातील पोषण मूल्य कमी होऊन जातात. पण योग्य पद्धतीने फळांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Learn when to consume fruits according to ayurveda fruits after meal fruit side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • best fruit juices
  • healthy fruits
  • side effect

संबंधित बातम्या

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Benefits Eating Cherries: चेरी ठरेल सुपरफूड! रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Health Tips: हेल्दी स्नॅक्स खाऊनही पोट सुटलंय? ‘या’ सवयींमुळे वाढू शकते वजन
2

Health Tips: हेल्दी स्नॅक्स खाऊनही पोट सुटलंय? ‘या’ सवयींमुळे वाढू शकते वजन

थकवा घालवण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिता? हृदयापासून लिव्हरपर्यंत संपू्र्ण शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
3

थकवा घालवण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिता? हृदयापासून लिव्हरपर्यंत संपू्र्ण शरीरावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.