साहित्य कॉफी पावडर दुध साखर कृती सुरवातीला दूध गरम करा. दूध चांगले गरम झाल्यानंतर दुधावर जो फेस आलेला असतो त्यातील दोन चार चमचे तुमच्या कपामध्ये घ्या. त्या फेसात मग तुम्हाला पाहिजे असेल तेवढी कॉफी पावडर आणि साखर टाका. एका चमच्याने तुमच्या कपातील फेस, कॉफी आणि साखर यांची थोडी घट्ट क्रीम होईल असे हलवत रहा. एकदा का समरस क्रीम तयार झाली की गरम दूध त्यात कपात ओता. त्यामुळे कॉफी वर फेस येईल.