वर्षभर टिकणारी लसूण पावडर
आयुर्वेदामध्ये लसणीला भरपूर महत्व आहे. लसणीच्या प्रत्येक पाकळीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी लसणीचा वापर केला जातो. जेवणात जर लसूण नसेल तर जेवणाची चव व्यवस्थित लागत नाही. लसणीमुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. रोजच्या आहारात लसणीचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. एखाद्या पदार्थाला जर लसणीची फोडणी दिली तर तो पदार्थ चवीला आणखीन सुंदर लागतो. पण अनेकदा लसूण घरामध्ये साठवून ठेवला जातो. पण साठवलेला लसूण खराब झाल्यानंतर त्याचा काहीच उपयोग करता येत नाही.
जेवणामध्ये लसणीचा वापर करत असताना लसूण सोलून मग ती जेवणात टाकावी लागते. काहीवेळा आपल्या लसूण सोलण्याचा कंटाळा येतो. लसूण सोलणं हे किचकट आणि जास्त वेळ लागणार काम असल्याने अनेकांना लसूण सोलायला आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्षभर टिकणारी लसणाची पावडर कशी तयार करायची याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल. या पावडरचा वापर तुम्ही जेवण बनवताना किंवा इतर लसणीचे पेय बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. (फोटो सौजन्य- istock)