डीवायएसपी धनंजय पाटलांचा गणेश मंडळांना इशारा (फोटो- टीम नवराष्ट्र)
ओतूर/ मनोहर हिंगणे: येऊ घातलेल्या गणेशोत्सव काळात सर्व गणेश मंडळानी कायद्याचे तंतोतंत पालन करावे,सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या गावाचा व आपल्या मंडळाचा नाव लौकिक वाढवावा मात्र कोणी कायद्याचे उल्लंघन करून गैरकृत्य केल्यास कठोर पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा दि. १३ ऑगस्ट रोजी ओतूर येथील क्रीडा संकुलन सभागृह येथे आयोजित गणेश मंडळांच्या पदाधिकारी व पोलिस बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिला आहे.
यावेळी ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी २०२५ च्या गणेशोत्सव काळात मंडळानी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी कायदेशीर नियमावली जाहीर केली ती पुढील प्रमाणे -1)रजिस्टर नसलेल्या गणपती मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचे कडुन तात्पुरता परवाना घेणे जरूरीचे आहे.