Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट
यामाहाने देशात स्टायलिश बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. यासोबतच कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या वाहनांमध्ये महत्वाचे अपडेट करत असते. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय 125cc Fi Hybrid स्कूटर श्रेणीला मोठे अपडेट देत Fascino 125 Fi Hybrid आणि RayZR 125 Fi Hybrid मध्ये प्रगत स्मार्ट फीचर्स आणि आकर्षक नवीन कलर ऑप्शन्स सादर केले. या अपडेटमुळे रायडर्सना अधिक कनेक्टेड, स्टायलिश आणि गतीशील राइडिंग अनुभव मिळणार आहे.
Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही
2025 च्या हायब्रिड स्कूटर लाइन-अपमध्ये यामाहाने ‘Enhanced Power Assist’ फंक्शनची भर घातली आहे. हे फंक्शन यामाहाच्या नाविन्यपूर्ण हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित असून उच्च कार्यक्षम बॅटरीच्या सहाय्याने स्कूटरला अधिक टॉर्क देते. त्यामुळे स्कूटर थांबलेली असताना सुरुवातीचे ॲक्सेलरेशन अधिक सुलभ होते. स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) तंत्रज्ञान, सायलेंट स्टार्ट व स्टॉप-अँड-स्टार्ट सिस्टीम यामुळे या स्कूटर्स जागतिक दर्जाची इंधन कार्यक्षमता आणि उच्च आरामदायीपणा देतात.
प्रिमियम व्हेरिएंट Fascino S मध्ये आता कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व टर्न-बाय-टर्न (TBT) नेव्हिगेशन मिळते. वाय-कनेक्ट ॲपच्या सहाय्याने स्कूटरला स्मार्टफोनशी सहज कनेक्ट करता येते, ज्यातून गुगल मॅप्सद्वारे रिअल-टाइम दिशा, जोड रस्त्यांचे अलर्ट आणि रस्त्यांची नावे मिळतात. त्यामुळे रायडिंगदरम्यान कनेक्टिव्हिटी आणि सोयीसुविधा दोन्ही वाढतात.
नवीन कलर ऑप्शन्समध्ये Fascino S 125 Fi Hybrid स्टायलिश मॅट ग्रे, डिस्क ब्रेक व्हेरिएंट मेटलिक लाईट ग्रीन, आणि ड्रम ब्रेक व्हेरिएंट मेटलिक व्हाईट रंगात उपलब्ध आहे. RayZR 125 Fi Hybrid Street Rally मॅट ग्रे मेटालिकमध्ये, तर RayZR 125 Fi Hybrid डिस्क व्हेरिएंट स्पोर्टी सिल्व्हर-व्हाईट कॉकटेल रंगात उपलब्ध आहे.
लवकरच Mahindra BE6 Black Edition चे आगमन होणार, मिळणार फास्ट चार्जिंग आणि लॉन्ग रेंज
यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इतारू ओटानी म्हणाले, “यामाहाची 125cc हायब्रिड स्कूटर श्रेणी ग्राहकांना स्टायलिंग, आरामदायीपणा आणि इंधन कार्यक्षमतेचे उत्तम मिश्रण देते. नवीन ‘Enhanced Power Assist’ फंक्शनमुळे रोजच्या राइडिंगमध्ये अधिक सोय आणि आत्मविश्वास मिळेल.”
यामाहाच्या हायब्रिड स्कूटर मॉडेल्समध्ये एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड 125cc ब्ल्यू कोअर हायब्रिड इंजिन, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ, 21 लिटर अंडर-सीट स्टोरेज, E20 इंधन सुसंगतता आणि सुधारित मायलेज आहे. Fascino S आणि RayZR Street Rally व्हेरिएंट्समध्ये ॲन्सर-बॅक फिचर आणि एलईडी डीआरएलही मिळतात. चला या अपडेटेड स्कूटरची किंमत जाणून घेऊयात.