कलौंजी बाबत एक विशेष बाब म्हणजे केवळ जिभेचे चोचले पुरवायलाच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा हा मसाला खूप फायद्याचा आहे. अगदी अशा या बहुगुणी मसाल्याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य:
- धणे 1/2 कप
- बडीशेप 1/4 कप
- जिरे 1/4 कप
- मेथीचे दाणे 1 Tea Spoon
- लाल मिरची 6-8
- काळी मिरी 7-8
- आमचूर पावडर 2 Tea Spoon.
रेसिपी :
आमचूर पावडर वगळता आपण जमा केलेले हे सर्व मसाले गरम तव्यावर भाजून घ्या, एकदा मिक्सर मध्ये वाटून घ्या, आणि मग त्यात आमचूर पावडर घाला आणि चमच्याने मिक्स करा. थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.
आपण हा मसाला वापरून अगदी साध्या भाज्यांना सुद्धा वेगळाच फ्लेव्हर देऊ शकता, विशेषतः कारले, वांगी, बटाटा, भेंडी या भाज्यांसाठी हा मसाला वापरला जातो. ज्या पद्धतीने आपण भरलेली वांगी करतो त्याच पद्धतीने केवळ हा कलोंजी मसाला भरून आपल्याला या भाज्या बनवता येतील














