Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने गोड पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडेल. चला तर जाणून घेऊया गोड पोहे बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 03:30 PM
तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर कांदापोहे बनवून खाल्ले जातात. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा हे नाश्त्यातील अतिशय फेमस पदार्थ आहेत. पण नेहमी तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये गोड पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पोहे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. प्रत्येक घरात कायमच पोहे उपलब्ध असतात. त्यामुळे पोह्यांपासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. कोकणात दिवाळी सणाच्या दिवशी गोड पोहे बनवण्याची पद्धत आहे. जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा अजूनही तितक्याच आवडीने फॉलो केली जाते. चला तर जाणून घेऊया गोड पोहे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा

साहित्य:

  • पोहे
  • गूळ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • काळे तीळ
  • तूप
  • मीठ
  • काजू
  • वेलची पावडर
उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोकणी पद्धतीमध्ये गोड पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ करून सुपाने पाखडून घ्या. यामुळे बारीक घाण बाहेर पडून जाईल.
  • स्वच्छ करून घेतलेले पोहे भांड्यात घेऊन त्यात पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि चाळणीवर काढून घ्या.
  • जास्त वेळ पोहे पाण्यात भिजवून ठेवल्यास पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोहे हलकेसे ओलसर झाल्यानंतर लगेच काढून घ्यावे.
  • भिजवलेल्या पोह्यांमध्ये बारीक करून घेतलेले गूळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात काजूचे काप लालसर भाजा. त्यानंतर काळे तीळ घालून हलकेसे भाजा.
  • त्यानंतर त्यात गूळ मिक्स करून घेतलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करा आणि थोडीशी वेलची पावडर घालून पोहे व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून ओल्या खोबऱ्याचा किस घालून पोहे खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत कोकणी पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट गोड पोहे. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जातो.
 

Web Title: Make sweet poha in traditional konkan style simple breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.