Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडे कोलेजन ड्रिंक पिणे कायमचे जाल विसरून! चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी घरगुती आणि नॅचरल पेयांचे सेवन करावे. यामुळे त्वचेवरील चमक वाढते आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 09:37 AM
महागडे कोलेजन ड्रिंक पिणे कायमचे जाल विसरून! चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' पेयाचे सेवन

महागडे कोलेजन ड्रिंक पिणे कायमचे जाल विसरून! चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' पेयाचे सेवन

Follow Us
Follow Us:

महिलांसह सर्वच पुरुषांना सुद्धा डागविरहित त्वचा हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. पिंपल्स, ऍक्ने, सुरकुत्या, काळे डाग याशिवाय त्वचेच्या इतर समस्या वाढू लागतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयात शरीरातील कोलेजनची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. ही पातळी वाढवण्यासाठी हागड्या कोलेजन पावडर, डिटॉक्स सप्लिमेंट्स किंवा केमिकल प्रॉडक्ट्स वापरण्यावर जास्त भर दिला जातो. पण वारंवार महागडे सप्लिमेंट्स किंवा हानिकारक डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे

कोलेजनची पातळी कमी झाल्यानंतर त्वचेवरील चमक कमी होते आणि त्वचा सैल पडण्यास सुरुवात होते. त्वचा सैल पडल्यानंतर ती पुन्हा एकदा घट्ट आणि चमकदार करण्यासाठी कायमच वेगवेगळे उपाय केले जातात. पण त्याऐवजी घरगुती पेयांचे सेवन करून त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढवावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी नॅचरल कोलेजन ड्रिंक कसे तयार करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी केलेले उपाय एका रात्रीमध्ये त्वचेची गुणवत्ता सुधारत नाही. यासाठी वारंवार घरगुती पेयांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी उपाय:

त्वचेची पोत आणि चेहऱ्यावरील चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लिंबू पाणी पिणे फार आवश्यक आहे. लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी त्वचा अधिक चमकदार करतात. लिंबू पाण्यासोबतच आठवड्यातून दोनदा नारळ पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. लिंबू पाणी त्वचा पूर्णपणे डिटॉक्स करत नाही तर शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजन वाढते.

महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी उपाशी पोटी ग्रीन टी प्यावा. ग्रीन टी च्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. यामध्ये पॉलीफेनॉल आणि EGCG सारखे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यास मदत करतात. उन्हामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाकण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे नियमित ग्रीन टी, ब्लु टी किंवा जास्वदींच्या फुलांचा चहा प्यावा. डॉक्टरांच्या मते, कोणतेही सप्लिमेंट्स त्वचेची गुणवत्ता लगेच सुधारत नाहीत. त्यासाठी आहारात फळे, पालेभाज्या आणि इतर आवश्यक पोषक घटकांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make this drink a regular part of your routine to boost your faces natural glow skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • detox drinks
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण
1

Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण

Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे
2

Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे

पोटात कायमच जडपणा जाणवतो? आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरीच तयार करा आयुर्वेदिक चूर्ण, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम
3

पोटात कायमच जडपणा जाणवतो? आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरीच तयार करा आयुर्वेदिक चूर्ण, बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड
4

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.