चपातीच्या पिठात मिक्स करा या पौष्टिक बिया
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेक वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, धूम्रपान करणे, अपुरी झोप, तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.यामुळे प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे लठ्ठपणा, वाढलेले वजन. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. वाढलेल्या वजनामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची वाढ होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी रोजच्या आहारात भात खाण्याऐवजी चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भात खाल्यामुळे पोट लगेच भरते आणि अधिककाळ भूक लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पिठात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमचे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव होईल.
अळशीच्या बिया आरोग्यसाठी अतिशय पौष्टिक आहेत. या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अळशीच्या बियांचे सेवन करावे. अळशीच्या बियांची बारीक पावडर करून गहू किंवा मैद्याच्या पिठात मिक्स करून चपाती तयार करा. या चपातीचे नियमित सेवन केल्यास आरोग्यसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांमध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. शिवाय यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. चपातीच्या पिठामध्ये तुळशीची पाने बारीक करून टाकल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चपाती बनवण्यासाठी पांढर पीठ वापरण्याऐवजी गव्हाचं पीठ वापरावे. गव्हाच्या पिठातील गुणधर्मांमुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात चपातीचे सेवन करावे. तसेच यामुळे वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.