(फोटो सौजन्य: istock)
लठ्ठपणाची समस्या सामान्य वाटत असली तरी यामुळे पुढे जाऊन आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वजन वाढायला वेळ लागत नसला तरी वाढलेले वजन कमी करायला मात्र फार मेहनत घ्यावी लागते. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन झपाट्याने वाढत असते. वजन कमी करायचं म्हटलं की, जिम, डाएट या गोष्टी आपल्या मनात पाहिल्या येऊ लागतात. अनेकांना वाटतं जिम-डाएट करूनच आपण आपलं वजन कमी करू शकत पण असं नाहीये. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरबसल्याही काही चांगल्या सवयींचा तुमच्या जीवनशैलीत अवलंब करून तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. चला विना डाएट आणि विना जिम वजन कसं कमी करायचं ते जाणून घेऊया.
फिटनेस कोचने केलं वेट लॉस
अलिकडेच, फिटनेस कोच अँड्रिया यांनी ४३ किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे आणि त्यांना खूप प्रेरणा दिली आहे. इंस्टाग्रामवर अँड्रियाने सांगितले की तिचे वजन १०८ किलो होते आणि आता तिचे वजन ६५ किलो झाले आहे. चला तर मग अँड्रियाच्या कोणत्या सवयींमुळे तिची वेट लॉस जर्नी बूस्ट होण्यास मदत झाली ते जाणून घेऊया.
स्वतःला सतत प्रेरित करा
अँड्रिया यांनी निरोगी आणि संतुलित आहार योजनेचे पालन करून वजन कमी केले. काही लोक वजन कमी करण्यासाठी खाणे-पिणे थांबवतात, परंतु असे केल्याने त्यांचे आरोग्य बिघडू शकते. वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमची मानसिकता सकारात्मक ठेवली पाहिजे. वजन कमी करण्याच्या प्रवासात येणाऱ्या आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा लोक खूप लवकर हार मानतात आणि जेव्हा त्यांना निकाल मिळत नाही तेव्हा प्रयत्न करणे थांबवतात. वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला सतत प्रेरित करत राहावे लागते.
पुरेशी झोप घ्या
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करायचा असेल, तर दररोज ७-८ तास गाढ झोप घ्या. याशिवाय, वजन कमी करण्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करणे देखील खूप महत्वाचे आहे.
अर्धा तास चाल महत्त्वाची
वजन कमी करण्यासाठी शरीराची चाल फार महत्त्वाची आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज अर्धा तास चालणे आवश्यक आहे. जेवण केल्यानंतर तुम्ही काही वेळ चालू शकता, असे केल्याने खाल्लेले अन्नपदार्थ जिरते ज्यामुळे शरीरावर फॅट जमा होत नाही. फार कठीण नाही पण या छोट्या सवयींचे पालन करून तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला आणखीन सोपे आणि यशस्वी बनवू शकता.
मी माझ्या क्रेव्हिंग्स कशा रोखू शकते?
इच्छांसाठी तयार राहा आणि निरोगी नाश्ता तयार ठेवा. हलक्या नाश्त्याची क्रेव्हिंग होत असेल तर निरोगी पदार्थ खायला सुरुवात करा.
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समृद्ध संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.