दक्षिण भारतासह इतर ठिकाणी नारळ तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे पदार्थाची चव वाढते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. शिवाय नारळाच्या तेलाचा वापर केस आणि त्वचेसाठी सुद्धा केला जातो. नारळाच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग, पिंपल्स घालवण्यासाठी मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडल्यानंतर त्वचेवर इतर कोणतेही महागडे प्रॉडक्ट लावण्याऐवजी खोबऱ्याचे तेल लावावे. यामुळे त्वचेमधील तेल तसेच टिकून राहते आणि त्वचा नैसर्गिकपणे हायड्रेट राहते. खोबऱ्याचे तेल त्वचेला मॉईश्चज करण्याचे काम करते. खोबऱ्याच्या तेलात अँटीमायक्रोबिअल गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडून जाते. कोरड्या पडलेल्या त्वचेवर मेकअप केला तरीसुद्धा त्वचेवर टिकून राहत नाही. अशावेळी कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणता पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याचे तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलात विटामिन इ मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा उजळदार दिसू लागते. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी २ थेंब खोबरेल तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर लावून घ्या. यामुळे रात्री शांत झोप लागेल. शिवाय यामुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते. त्यानंतर 1 तासांनी चेहरा धुवून टाकावा.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी खोबऱ्याच्या तेलात हळद मिक्स करून लावावी. यासाठी २ चमचे खोबरेल तेल घेऊन त्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर 15 मिनिटं ठेवून पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास त्वचेवर डाग आणि पिंपल्स निघून जातील. शिवाय काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात मध मिक्स करून त्वचेवर लावा. यासाठी २ चमचे खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात मध मिक्स करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चांगली दिसेल. त्वचेवरील मसल्स रिलॅक्स करण्यासाठी नारळाचे तेल अतिशय प्रभावी आहे. खोबऱ्याच्या तेलाने मसाज केल्यास त्वचेमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल, ज्यामुळे त्वचेवर तेज येईल.