Roasted Corn Recipe : पावसाच्या सरीत गरमागरम चटपटीत चवीचा भाजलेला मका खाण्याची मजा काही वेगळीच. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच ही रेसिपी घरी बनवू शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
पावसाळ्यात बाजारात मके मोठ्या प्रमाणात येतात.
या सीजनमध्ये भाजलेला मका खाण्याची मजाच काही न्यारी.
हा चटपटीत, स्मोकी भाजलेला मका तुम्ही घरी देखील बनवू शकता.
पावसाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला कोळशाच्या निखाऱ्यांवर भाजलेल्या मक्याचा दरवळ अनेकांना आकर्षित करतो. बटरमध्ये भाजलेला मका, त्यावर चटकदार मसाले आणि हलका लिंबाचा रस यामुळे याची चव आणखीनच खुलते. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका खाण्याची मजाच काही न्यारी. घरीही अगदी त्याच स्ट्रीट स्टाईल पद्धतीने भाजलेला मका तयार करता येतो. योग्य प्रकारे भाजल्यास मक्याला हलकी स्मोकी चव येते. संध्याकाळच्या चहासोबत, पावसाळ्यातील गप्पांमध्ये किंवा हलक्या स्नॅकसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव यामुळे ही रेसिपीतुम्ही एकदा तरी नक्की करून पाहावी.