घराची स्वछता राखण्यासाठी वेळोवेळी साफसफाई करणे गरजेचे आहे. घरची स्वछता न राखल्यास अनेक जीव-जंतूंचा संभ्रम वाढण्याची शक्यता असते आणि यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. घरात लहान मुले दिवसभर जमिनीवर बसून खेळत असतात. घरातील सर्वजण दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात. अशात लादीवर धूळ किंवा जीवजंतू असले तर ते मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.
मात्र अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपल्याला रोजरोज घरची साफसफाई करणे जमत नाही. आपण वरवर घर आवरतो मात्र दररोज चकचकीत घर साफ करणे काही आपल्याला जमत नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी यावर एक उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुमचे रोज रोज लादी पुसण्याचे टेन्शन दूर होईल आणि तुमचे घरही स्वछ राहील. या युक्तीने तुम्हाला रोज पुसण्याची गरज भासणार नाही. तसेच तुमच्या घराची फरशी देखील स्वच्छ आणि जंतूमुक्त राहील.
गुलाबजल
जर तुम्हाला दररोजच्या लादी पुसण्याचा समस्येपासून सुटका हवी असेल तर यात गुलाबजल तुमची मदत करू शकते. यासाठी प्रथम अर्धी बादली भरेल एवढे पाणी घ्या. आता यात एक चमचा मीठ टाका. आता यात एक चमचा फिनायल टाका. तसेच यात एक चमचा गुलाबजल टाका. सर्व गोष्टी पाण्यात व्यवस्थित एकत्र करा आणि याने लादी पुसा. याने तुमचे लादी एकदम साफ आणि चकचकीत होईल.
कपूर आणि लवंग
कपूर आणि लवंगदेखील लादी साफ राखण्यास मदत करू शकते. यासाठी 5-6 कपूर घेऊन त्याची बारीक पावडर बनवा. आता ही तयार पावडर लादी पुसायचा पाण्यात टाकून मिसळा. आता लवंग तेल घेऊन पाण्यात मिसळा. तयार झालेल्या पाण्याने लादी स्वछ पुसा. लादी स्वछ ठेवण्यासाठी हा एक उत्तम आणि रामबाण उपाय आहे.
तुरटी
आपल्या घरातील लादीवर अनेक हानिकारक जिवाणू असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हे जिवाणू घालवण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी तुरटी फार मदतीची ठरत असते. तुरटीने तुम्ही बाथरूम देखील साफ करू शकता. यासाठी पाण्यात तुरटी पावडर टाकून गरम करा. या पाण्याने तुम्ही वॉश बेसिन, फ्लश, सिंक यांसारख्या अनेक गोष्टी स्वछ करू शकता.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.