(फोटो सौजन्य – istock)
या देशाने मारली पहिल्या क्रमांकावर बाजी
कामाच्या व्यापात अनेकजण आपला अधिक काळ ऑफिसमध्ये घालवतात. काही लोक कामामुळे ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतात, तर काहीजण अफेअर्समुळे तिथे जास्त वेळ घालवतात. अभ्यासात ऑफिस अफेअर्स कोणत्या देशात अधिक चालतात याची माहिती काढण्यात आली आणि यात पहिल्या क्रमांकावर मेक्सिको या देशाचे नाव समोर आले आहे.
भारत या क्रमांकावर…
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण अभ्यासानुसार ऑफिस अफेअर्सच्या या रिपोर्टमध्ये भारताचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, भारतात ऑफिस अफेअर्सचे प्रमाण सर्वाधिक आहेत. हे सर्वेक्षण ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका येथे करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार, मेक्सिको पहिल्या क्रमांकावर होता, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ऑफिस अफेअर्स आता फक्त अमेरिका, यूके आणि कॅनडापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; ते भारतातही सामान्य झाले आहेत.
ऑफिस अफेअर्ससाठी पुरुषांचा कल जास्त
सर्वेमध्ये हे देखील स्पष्ट झाले आहे की, महिलांपेक्षा पुरुष मंडळी ऑफिस रोमान्ससाठी अधिक मोकळे असतात. शिवाय, सर्वेक्षणातून असेही दिसून आले की महिला त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाचे मिश्रण करण्याबाबत अधिक सावध असतात. २९% ऑफिस अफेअर्सपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर फक्त २७% पुरुष ऑफिस अफेअर्स टाळण्याचा प्रयत्न करतात.






