४४ कोटींपेक्षा अधिक भारतीय २०२५ पर्यंत होतील लठ्ठ! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बदलेली जीवनशैली, सतत आहारात होणारे बदल आणि व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण बनवतो. लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी वेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकते.लठ्ठपणा वाढल्यानंतर खाली बसताना किंवा वर उठताना अनेक त्रास होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
भारतामध्ये अनेक गंभीर आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामध्ये लठ्ठपणा हा सामान्य आजार झाला आहे.नुकताच समोर आलेल्या आवाहालामध्ये 2050 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय लठ्ठपणाचे शिकार होण्याची शक्यता आहे, अशी धक्कादायक माहिती आवाहलातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी हा आवाहाला सादर करण्यात आला. याशिवाय लठ्ठपणाबाबत सादर करण्यात आलेल्या आव्हालाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी चांगली जीवनशैली अंगीकारून नेहमी निरोगी राहावे, असा सल्ला देखील दिला आहे.
आहारात सतत होणारे बदल, वातावरणातील बदल, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, व्यायाम इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. काहींना सतत काहींना काही खाण्याची सवय असते. मात्र वारंवार कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. फॅटी लिव्हर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि कर्करोग इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि पुरेशी झोप घेऊन निरोगी आरोग्य जगता येते.
शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक महिला आहारतज्ञांच्या सल्ल्याने डाएट घेतात. मात्र चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे वजन कमी करताना कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय निरोगी चरबी आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली चरबी कमी होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे किंवा चिया सिड्सच्या पाण्याचे सेवन करावे.