प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा राधिका मर्चंटसोबत पार पडणार आहे. मार्चमध्ये अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग जामनगरमध्ये पार पडले. तसेच २९ मे आजपासून पुन्हा एकदा अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण अंबानी कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सगळीकडे त्यांच्या प्री-वेडिंगचा उत्साह आहे. पण लग्नाधीचा अंबानी कुटुंबाचे राधिकासोबत एक खास नाते तयार झाले आहे. त्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले आहेत. राधिका मर्चंटचे अंबानी कुटुंबातील सर्व व्यक्तींसोबत एक वेगळे नाते तयार झाले आहे. (फोटो सौजन्य- गूगल)
राधिका मर्चंट ही लवकरच अंबानी कुटुंबीयांची सून होणार आहे. त्यापूर्वी तिचे मुकेश अंबानी यांच्यासोबत खास नाते झाले आहे. राधिका मर्चंट म्हणाली , मी सासर आणि माहेरच्या नात्याबद्दल बोलत नाही, तर आमच्यात एक नातं आहे जे प्रत्येक मुलीला तिच्या सासरच्या घरात हवं असतं. राधिकाने मुकेश अंबानींनीबद्दल हे वक्तव्य केल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात पाणी आले. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करताना राधिका म्हणाली, मुकेश काका, आमचे नाते सुरू होण्यापूर्वीपासून तुम्ही माझ्या आयुष्यात वडिलांसारखे आहात. मला अशा आहे की या नात्यात तुम्ही आमच्यासाठी चॅम्पियन आहात.
[read_also content=”‘हुस्न परी जानेजहाँ’, सई ताम्हणकरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, क्लासी लुकने वेधले लक्ष https://www.navarashtra.com/lifestyle/actress-sai-tamhankar-looks-stunning-in-red-classy-dress-mesmerizes-fans-with-her-glam-539925.html”]
मार्चमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग पार पडले. यात राधिका मर्चंटने अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या. ज्या ऐकून अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले.लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आईवडिलांना सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागत. सासरी गेल्यानंतर तिकडे नवीन नाती जोडावी लागतात. पण काही काळानंतर ती नाती टिकवणं कठीण होऊन जात. पण नीता अंबानींसारखी सासू आणि मुकेश अंबानींसारखे सासरे असतील तर सर्व अडचणी दूर होतील. ते मला पुढे मुलीप्रमाणे वागवतात.त्यामुळे कोणत्याही मुलीला नवीन घरात गेल्यानंतर अडचणी येणार नाहीत, असे राधिका मर्चंट म्हणाली.