Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून

तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी महिला हेअर डाय किंवा हेअर कलर लावतात. पण त्याऐवजी मेहेंदीमध्ये हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहण्यास मदत होईल आणि केस काळेभोर दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 01:56 PM
पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा 'हे' पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून

पांढऱ्या केसांवर येईल नैसर्गिक काळा रंग! मेहेंदी भिजवताना मिक्स करा 'हे' पदार्थ, महागड्या पार्लर ट्रीटमेंट करणे कायमचे जाल विसरून

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, वाढते प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर केस तुटणे, केस गळणे तर काहीवेळा तरुण वयात केस पांढरे होऊन जातात. केस पांढरे झाल्यानंतर सर्वच महिला आणि मुली केसांची काळजी घेण्यासाठी हेअर कलर, हेअर डाय तर काहीवेळा महागड्या हेअर ट्रीटमेंट करून केस सुंदर करतात. पण हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळच केस अतिशय चमकदार आणि सुंदर राहतात. पुन्हा एकदा कालांतराने केसांच्या समस्या वाढू लागतात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी वेगवेगळे हेअर कलर लावले जातात.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

वारंवार हेअर कलर किंवा हेअर डाय केल्यामुळे केस पूर्णपणे निस्तेज आणि कोरडे होऊन जातात. तसेच केसांच्या समस्या आणखीनच वाढून केस निस्तेज होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करताना मेहंदीमध्ये कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नैसर्गिक पदार्थांच्या वापरामुळे केस चमकदार दिसण्यासोबतच केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर दिसतात. यामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

साहित्य:

  • मेहेंदी पावडर
  • कॉफी
  • लवंग
  • चहाची पावडर
  • तमालपत्र
  • हळद पावडर
  • पाणी

कृती:

मेहेंदी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर चहा पावडर, कॉफी पावडर, लवंग आणि तमालपत्र घालून पुन्हा एकदा मंद आचेवर उकळवून घ्या. सर्व पदार्थांचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर रंग बदलून जाईल. गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. वाटीमध्ये मेहेंदी पावडर घेऊन त्यात चिमूटभर हळद घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात तयार केलेले पाणी मिक्स करून सर्व मेहेंदी चमच्याने मिक्स करून घ्या. भिजवलेली मेहेंदी लोखंडी कढईमध्ये रात्रभर ठेवून द्या. यामुळे मेहेंदीमध्ये सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील. लोखंडी कढईमध्ये मेहेंदी भिजवल्यास केसांना रंग चांगला येतो.

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

मेहेंदी केसांना लावण्याआधी केस अजिबात चिकट किंवा तेलकट नसावे. असे असल्यास केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तयार केलेली मेहेंदी केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावा. दोन ते तीन तास ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. केस धुवताना शाम्पू किंवा कंडिशनरचा अजिबात वापर करू नये. हळदीच्या वापरामुळे टाळूवर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल आणि केस अतिशय स्वच्छ राहतील. केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Natural black color will come on white hair mix these ingredients while soaking mehendi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक
1

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ होईल कमी
2

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक
3

Sink Cleaning Tips: चिकट आणि घाणेरडा झाला आहे किचन सिंक? ५ रुपयांच्या या घरगुती पदार्थांपासून मिळवा नव्यासारखी चमक

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम
4

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा बडीशेप, महिनाभरात व्हाल स्लिम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.