चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
सर्वच महिलांना चमकदार आणि डागविरहित त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर तो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. वातवरणात होणारे बदल, मानसिक तणाव, आहारात तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे फोड, पिंपल्स, सुरकुत्या इत्यादी त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट, फेस सीरम किंवा इतर वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. प्रत्येक महिन्याला स्किन केअरवर हजारो रुपये खर्च केले जातात. पण यामुळे सुद्धा फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचाभर तुपाचा वापर करून नॅचरल क्रीम तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर क्रीम लावल्यास त्वचा सुंदर आणि देखणी होईल.(फोटो सौजन्य – istock)
कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी तुपापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराइज होण्यास मदत होते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी तुपापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. पण जास्त तेलकट त्वचा असल्यास तुपाच्या क्रीमचा वापर करू नये. यामुळे चेहऱ्यावरील फोड आणि तेल कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागेल. नियमित चेहऱ्यावर तुपाच्या क्रीमचा वापर केल्यास आठवडाभरात त्वचा सुंदर होईल.






