Realme P4 Lite: 10 हजारांहून कमी किंमतीत दमदार फोन? 6,300mAh बॅटरी आणि 90Hz स्क्रीन... फीचर्स वाचून थक्क व्हाल!
भारतात रिअलमी पी 4 लाईट स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB + 128GB यांचा समावेश आहे. या डिव्हाईसच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या टॉप ऑफ द लाईन 4GB + 128GB व्हेरअंटची किंमत 11,999 रुपये आहे. कंपनी 1,000 रुपयांची बँक सूट किंवा 1,000 रुपयांचे कूपन देखील देत आहे. हे हँडसेट भारतात 24 फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. Realme P4 Lite बीच गोल्ड, ऑब्सीडियन ब्लॅक आणि सी ब्लू कलर मध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य –Realme)
Realme P4 Lite एक डुअल सिम हँडसेट आहे, जो अँड्रॉईड 15-बेस्ड रियलमी UI वर आधारित आहे. हँडसेटमध्ये 6.74-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 563 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 180Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 16.7 मिलियन कलर्स आणि 83.5 टक्के NTSC कलर गॅमट आहे.
रिअलमीचा नवीन P4 Lite ऑक्टा कोर Unisoc T7250 चिपसेटवर आधारित आहे, जो 12nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 1.8GHz ची पीक क्लॉक स्पीड देण्यात कॅपेबल आहे. प्रोसेसर Mali G57 MP1 GPU सह जोडण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील आहे. Realme चं असं म्हणणं आहे की, हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देण्यासाठी IP54 रेटिंग दिली आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Realme P4 Lite मध्ये मागील बाजूला 76.5-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि 27mm फोकल लेंथ वाला सिंगल 13-मेगापिक्सेल (f/2.2) कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांचा फोन 1080p/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.
Realme P4 Lite मध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.2, Wi-Fi, BeiDou, GPS, GLONASS आणि गॅलीलियोला देखील सपोर्ट करतो. ऑनबोर्ड सेंसर लिस्टमध्ये एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, सिक्योरिटीसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, एक जायरोस्कोप आणि एक एक्सेलेरोमीटर समाविष्ट आहे.






