Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

Relationship Tips : लग्नानंतरचा काळ नवरा आणि बायकोसाठी फार खास मानला जातो. लग्नानंतरचे पहिले वर्ष त्याच्यांसाठी फार महत्त्वपूर्ण मानले जातात. काही मान्यतांनुसार, याकाळात जोडप्याने काही गोष्टींना टाळायला हवे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 11:37 AM
लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका 'या' चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका 'या' चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतरचं पहिलं वर्ष नवविवाहित जोडप्यासाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं.
  • या काळात काही धार्मिक परंपरा आणि प्रथा पाळण्याचा सल्ला दिला जातो.
  • काही मान्यतांनुसार, नवविवाहित महिलांनी दैनंदिन जीवनातील काही गोष्टींबाबत विशेष काळजी घ्यावी.
हिंदू धर्मानुसार लग्न हे फक्त दोन व्यक्तींमध्ये होत नाही तर दोन कुटुबियांच्या मिलनाचे हे एक कारण ठरते. लग्नानंतरचे पहिले वर्ष नवविवाहित जोडप्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. लग्नानंतर वर्षभरात अनेक परंपरांचे पालन केले जाते. धार्मिक मान्यता आणि परंपरांमध्ये काही अशा गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत ज्या नवविवाहित जोडप्याने करणे टाळायला हवे. या गोष्टींचे पालन न केल्यास संसारात अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा हे नियम महिलांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून किंवा माहेरच्यांकडून आधीच सांगितले जातात. पण तुम्हाला जर याविषयी काही माहिती नसेल तर आजची बातमी नक्कीच तुमच्या कामाची ठरेल.

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वर्षभर केस कापू नये

काही परंपरा आणि मान्यता सांगतात की, लग्नानंतर मुलीने वर्षभर आपले केस कापू नये. केसांना स्त्रीचे साैभाग्य मानले जाते. याचबरोबर यांना सकारात्मक उर्जेशीही जोडले जाते. यामुळेच नवविवाहित महिलेला लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात आपल्या केसांची खास काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

तेराव्याला जाणं टाळा

धार्मिक परंपरा आणि मान्यतांनुसार, विवाहित महिलेने वर्षभर कोणत्याही तेराव्याला किंवा मृत्यू भोजनाला उपस्थिती दाखवू नये. याचे कारण म्हणजे, लग्नानंतरचा काळ हा नवदाम्पत्यासाठी वैवाहिक जीवन अधिक दृढ करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचा काळ मानला जातो. अशात शोकाच्या ठिकाणी जाऊन तेथील नकारात्मक उर्जा आणि वातावरण तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतात.

कुंकु लावताना काळजी घ्या

हिंदू धर्मानुसार, कुंकु हे महिलेच्या साैभाग्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या नवऱ्याच्या नावाचे कुंकु पत्नी लावत असते. यामुळेच किमान वर्षभर कुंकु लावावा आणि ओला कुंकु कपाळावर लावू नये तर भांगेत लग्नावेळी जे कुंकु तुम्हाला देण्यात आले आहे फक्त त्याचा वापर करा. जेव्हा हे कुंकु संपेल तेव्हा तुम्ही नवीन कुंकवाचा वापर करु शकता.

माहेरुन मिळालेल्या साडीची विशेष काळजी

काही मान्यतांनुसार, लग्नानंतर माहेरुन मिळालेली साडी शुभशकुन आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच वर्षभर ही साडी खराब होणार नाही, जळणार नाही किंवा उसवणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. हे नवविवाहित जोडप्यासाठी शुभशकुन आणि दोन्ही कुटुंबांमधील सकारात्मक संबंधांचे लक्षण मानले जाते. शिवाय, लग्नाच्या वेळी मिळालेल्या साड्याच एक वर्ष वापराव्यात.

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

नदीजवळ जाण्यापासून वाचा

काही लोकांची अशीही मान्यता आहे की, लग्नाच्या वर्षभरात महिलेने गंगा, गोदावरी किंवा कोणत्याही नदीकिनारी जाणे टाळावे. तथापि, शास्त्रांमध्ये असा उल्लेख कुठेही करण्यात आला नाही. असं मानलं जात की, लग्नानंतरचे काही महिले नवरा-बायकोसाठी फार संवदेनशील असतात. नदीकिनारी किंवा स्मशानात नकारात्मक ऊर्जा असते ज्यामुळे नवविवाहित जोडप्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

 

Web Title: Newly married women first year hindu traditions things to avoid marital life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • lifestyle news
  • marriage
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
1

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
2

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक
3

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे
4

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.