पंचांगानुासार, अक्षय्य तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला १० मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते.
पंचांगानुासार, अक्षय्य तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला १० मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करून देवी लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचा विधी आहे. धार्मिक मान्यतेनुसार सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती येते. यावर्षी अक्षय्य तृतीया शुकर्वार, दि. 10 मे रोजी साजरी होणार आहे. यावेळी राजयोगासह गजकेसरी योगात या तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी खाद्यपदार्थांची खरेदी देखील खूप शुभ असते. मेष राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी मसूर खरेदी करावी. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी मसूल डाळीची खरेदी केल्याने शुभ फळ मिळते.
वृषभ रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ आणि बाजरी खरेदी करावी. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तांदूळ आणि बाजरी खरेदी केल्याने आर्थिक बाजू मजबूत होते.
मिथुन रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी मूग आणि कोथिंबीर खरेदी करावी. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने शुभ फळ मिळते.
कर्क रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळ खरेदी करावी. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी दूध आणि तांदूळ खरेदी करणे शुभ मानले जाते.
सिंह रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी सिंह राशीच्या लोकांनी फळ खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी फळ खरेदी करणे शुभ मानले जाते.
कन्या रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी कन्या राशीच्या लोकांनी मूग डाळ खरेदी केली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने सुख शांतीचे अनुभव मिळतात.
तुळ रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी तूळ राशीच्या लोकांनी साखर आणि तांदूळ खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी या वस्तू खरेदी केल्याने जीवन आनंदी होते.
वृश्चिक रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ आणि पाणी खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने कामात यश मिळेल.
धनु रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी धनु राशीच्या लोकांनी केळ आणि तांदूळ खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी केळ आणि तांदूळ खरेदी केल्यास आर्थिक लाभ होतो.
मकर रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी मकर राशीच्या लोकांनी डाळ आणि दही खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने कामात यश मिळेल.
कुंभ रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी तीळ खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, तीळ खरेदी केल्याने समस्या दूर होण्यास मदत होते.
मीन रास
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी मीन राशीच्या लोकांनी हळद आणि डाळ खरेदी केले पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने शुभ घटना घडतील.