असे म्हणतात की, मासाच्या जन्माबरोबरच त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्यावर अंत्यसंस्कार विधी केले जातात किंवा त्याला दफन केले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? माणसाच्या मृत्यूंनंतरही त्याच्याशरीरातील काही अवयव जिवंत असतात. व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी सर्व अवयव हे एकदम निकामी होत नाहीत, काही अवयवांचे कार्य हे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही मिनिटे किंवा काही तासांपर्यंत सुरू असते. मात्र हे अवयव ठराविक वेळेपर्यंत काम करत असतात. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याविषयीच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात टप्प्याटप्प्याने बदल होत जातात. हृदयाची धडधड थांबते, ऑक्सिजन न मिळाल्याने शरीरातील अवयव आणि पेशी निकामी होऊ लागतात. नोएडामधील यथार्थ हॉस्पिटल एक्स्टेंशनच्या पॅथॉलॉजीचे संचालक आणि एचओडी यांच्या मते, मृत्यूंनंतर व्यक्तीच्या अवयवांचे विघटन होण्यास सुरुवात होते. काही मिनिटांच्या आत पूर्णपणे ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या मेंदूच्या पेशींचे कार्य सामान्यतः 3-7 मिनिटांच्या आत पूर्णपणे बंद होते. यकृत अधिक लवचिक असल्याने मृत्यूनंतर तासाभरात त्याचे कार्य बंद होते. यादरम्यान रक्त जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीराचा रंग बदलतो, ज्याला लिव्हर मॉर्टिस असे म्हटले जाते.
हेदेखील वाचा – करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर
हेदेखील वाचा – जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि स्लिम