Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

Pancreatic Cancer : स्वादुपिंडाचा आजार दिवसेंदिवस वाढत असून अनेक लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. बऱ्याचदा लक्षणे इतकी साधी असतात की त्याकडे आपले दुर्लक्ष होते आणि यातूनच आजाराचा धोका दुपटीने वाढतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 08:15 PM
सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

सायलंट किलर ठरत आहे पॅनक्रियाज कॅन्सर! कावीळ आणि पचनक्रियेतील बदल देतात जीवघेणी चाहूल, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

Follow Us
Follow Us:
  • सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे जाणवत नाहीत, त्यामुळे समस्या ओळखणे कठीण होते.
  • कावीळ, पचनातील बदल आणि अचानक वजन घटणे यांसारखे संकेत दुर्लक्षित करू नयेत.
  • चांगल्या जीवनशैलीच्या सवयी आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरते.
पॅनक्रियाज कॅन्सर ज्याला मराठीत स्वादुपिंडाचा कर्करोग असे म्हटले जाते, हा एक गंभीर आजार आहे. स्वादुपिंडातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे हा आजार उद्भवला जातो. स्वादुपिंड हा पोटाच्या मागच्या भागात असलेला एक लहान अवयव आहे जो जेवण पचवण्यासाठी एन्झाइम तयार करतो. तो इन्सुलिनसारख्या हार्मोन्सद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. जेव्हा स्वादुपिंडामध्ये कर्करोग विकसित होतो तेव्हा तो सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय शांतपणे वाढतो. यामुळेच हा रोग जेव्हा फार वाढतो तेव्हाच लक्षात येतो ज्यामुळे अशा परिस्थितीत त्यावर उपचार करणे आणखी कठीण होऊन बसते.

अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

एका अहवालानुसार, स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे फार सामान्य असल्याने त्यांना पहिल्या टप्प्यांत ओळखता येत नाही, परिणामी आजार आणखी वाढू लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, सामान्य वाटणारी काही लक्षणे आपण प्रत्येकवेळी दुर्लक्षित करायला नकोत. जर ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर वेळीच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. बऱ्याच लोकांना थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर सौम्य पोटदुखी, पाठदुखी किंवा पोट भरल्यासारखे वाटणे यांसारखे अनुभव येतात. पोटाच्या सामान्य समस्या समजून याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो पण लक्षात ठेवा, हे आजार कर्करोगाच्या धोक्याचे संकेत देखील असू शकतात.

स्वादूपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

  • सौम्य मळमळ किंवा पचनक्रियेत बदल जाणवू लागणे.
  • कावीळचा त्रास जाणवणे.
  • त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे.
  • गडद रंगाची लघवी, फिकट रंगाचे शौच.
  • त्वचेला खाज सुटणे.
  • पाठ किंवा पोटात वेदना होऊ लागणे.
  • वजन कमी होणे.
ही सामान्य लक्षणे आहेत जी रोजच्या जीवनात आपल्याला अनेकदा जाणवतात पण आपण त्यांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. दिर्घकाळ जर अशा समस्या तुमच्या शरीराला त्रास देत असतील तर ते धोक्याचे चिन्ह असू शकते. अनेक उपाय करुनही जर या समस्या दूर होत नसतील तर याकडे प्रामुख्याने लक्ष द्या आणि वेळीच रुग्णालय गाठत यावर डाॅक्टरांचा योग्य सल्ला घ्या. लक्षात घ्या आजार होणे हे फार धोकादायक नसते तर त्याकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी अधिक धोकादायक ठरु शकते.

उपचार काय?

स्वादुपिंडाच्या आजाराचे निदान करण्यासाठी डाॅक्टर सीटिस्कॅन किंवा एमआरआय सारख्या चाचण्यांची मदत घेतात. शस्त्रक्रियेद्वारे हा आजार दूर करता येतो. याच्या मदतीने शरीरात तयार झालेली गाठ दूर करता येते, परंतु बहुतेकवेळी फक्त सुरुवातीच्या टप्प्यातच असे करणे शक्य असते. इतर उपचारांमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपीचा समावेश होतो.

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

स्वादूपिंडाचा आजार रोखण्यासाठी काय करावं?

आपल्या चुकीच्या सवयी आजारांना खुलं आमंत्रण देत असतात. अशात जर चांगल्या सवयींचा अवलंब केला तर अनेक आजारांपासून तुमच्या शरीराचे संरक्षण तुम्ही करु शकता. यासाठी सर्वप्रथम धुम्रपानाची सवय असल्यास तिला तात्काळ बंद करा. यामुळे कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. आहारात हेल्दी पदार्थांचे सेवन करा जसे की, भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये. यासोबतच जर तुम्हाला मद्यपानाची सवय असल्यास ही सवय वेळीच मोडा यामुळे यकृताचा सिरोसिस होण्याचा धोका वाढतो. दररोज न चुकता थोडा व्यायाम करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pancreatic cancer becoming a silent killer know the symptoms and remedies lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
3

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
4

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.