राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका
महाराष्ट्रात हवामान बदल आता केवळ पर्यावरणाचा मुद्दा राहिलेला नसून तो थेट सार्वजनिक आरोग्याचा गंभीर धोका बनला आहे. राज्याच्या स्टेट अॅक्शन प्लॅनमधील आकडेवारीनुसार, पूर, दुष्काळ आणि अतिवृष्टी यांसारख्या टोकाच्या हवामान घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व ताण निर्माण होत असून, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. टोकाचे हवामान, वाढते जलजन्य आजार यामुळे राज्य आरोग्य व्यवस्थेवर दुहेरी संकट स्थिती असते. राज्याच्या अहवालानुसार, महाराष्ट्राची भौगोलिक रचना आणि हवामानातील असमानता हीच आता मोठी जोखीम ठरत आहे. या टोकाच्या हवामानाचा सर्वाधिक फटका आरोग्य क्षेत्राला बसत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Diabetes रुग्णाचा आहार कसा असावा? काय खावे आणि काय खाऊ नये? लगेच नोंद करून घ्या…
डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासजन्य आजारांनी राज्यात अक्षरशः डोके वर काढले आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या २०१७ मधील ७,८२९ वरून २०२१ मध्ये १२,७२० पर्यंत झेपावली, तर मलेरियाचे रुग्ण २०१८ मधील १०,७५७ वरून १९,३०३ पर्यंत वाढले ही वाढ केवळ आकडे नाहीत, तर नियंत्रण सुटत चालल्याचे संकेत आहेत. अचानक पडणारा पाऊस तर कधी ऊन इत्यादी बदलत्या वातावरणामुळे आरोग्यासंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. सतत बदलणारे वातावरणात आरोग्यावर लगेच परिणाम करते. यामुळे डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की पाऊस, आर्द्रता आणि तापमानातील वाढ हीच या आजारांची पोषक जमीन आहे, वाढते तापमान आणि अनियमित पावसामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण आता पारंपरिक हंगामाबाहेरही आढळू लागले आहेत. मान्सून उशिरा माधारी फिरणे हा देखील एक गंभीर घटक ठरत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे पाणीजन्य आजारांचा धोका पुन्हा वाढला आहे. सुरक्षित पाण्याच्या सुविधा वाढूनही जोरदार पावसाच्या तडाख्यात अनेक भागात पिण्याचे पाणी दूषित होत असल्याने संसर्ग वाढत आहे.
हवामान बदलाचा वेग आणि त्याचे परिणाम पाहता, केवळ उपाययोजना जाहीर करून भागणार नाही, आरोग्य यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान धौरण यांचा एकत्रित आणि कठोर अंमल झाला नाही, तर महाराष्ट्राला भविष्यात अधिक भीषण आरोग्य संकटाला सामोरे जावे लागेल, हे निश्वित आहे.
Ans: हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, पूरस्थिती, दुष्काळ आणि अस्वच्छता यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे.
Ans: हे दोन्ही आजार डासांद्वारे पसरतात. साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर आणि पावसाळ्यातील परिस्थिती यामुळे डासांची संख्या वाढते.
Ans: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, प्लेटलेट्स कमी होणे (डेंग्यूमध्ये) अशी लक्षणे दिसू शकतात.






