Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel : पिसफुल डेस्टिनेशनच्या नावाने लोकप्रिय होत आहे हे ठिकाण; गर्दीपासून दूर… कुठे वसले आहे ते जाणून घ्या

Most Peaceful Hill Station : रोजच्या गजबटापासून दूर तुम्हीही शांततेच्या शोधात असाल तर या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्यायला हवं. शांततामय वातावरण, घनदाट जंगले, गरम पाण्याचा झरा, धबधबा या सर्वांमुळेच सोशल मिडियावर हे ठिकाण सर्वात शांततामय आणि सुंदर हिल स्टेशन म्हणून ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 08:23 AM
Travel : पिसफुल डेस्टिनेशनच्या नावाने लोकप्रिय होत आहे हे ठिकाण; गर्दीपासून दूर... कुठे वसले आहे ते जाणून घ्या

Travel : पिसफुल डेस्टिनेशनच्या नावाने लोकप्रिय होत आहे हे ठिकाण; गर्दीपासून दूर... कुठे वसले आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण शांतता आणि निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहे.
  • गर्दीपासून दूर हिरवळ, जंगलरस्ते आणि निसर्गरम्य ठिकाणांचा अनुभव येथे घेता येतो.
  • कमी बजेटमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत निवांत सुट्टी घालवण्यासाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.
मुंबईसारख्या गर्दीने भरलेल्या शहरातून काहीवेळ बाहेर पडून जर तुम्हाला शांततेत कुठे वेळ घालवायचा असेल तर एक चांगली ट्रीप प्लॅन तुम्हीच नक्कीच करायला हवाी. कामाच्या व्यापातून, रोजच्या तणावपूर्ण वातावरणातून थोडा ब्रेक घेऊन काही वेळ स्वत:साठीही काढायला हवा. प्रवास हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा मानला जातो, यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते. सध्या उन्हाळ्याचा सीजन सुरु असल्याने अधिकतर लोकांची पहिली पसंती ही हिल स्टेशन असते. इथल्या नैसर्गिक आणि आल्हाददायी वातावरणात मन एकदम शांत होते आणि सर्व ताण दूर होऊन जातात. तुम्हीही शांत आणि सुंदर हिल स्टेशनच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

कुठे आहे हे ठिकाण?

आपल्या शांत वातावरणासाठी लोकप्रिय असलेले हे हिल स्टेशन हिमाचल प्रदेशातील पर्वतांमध्ये वसले आहे. याचे नाव आहे मशोबरा जे शिमलापासून १२ ते १३ किमी अंतरावर आहे. इथली हिरवळ, सफरचंदांची झाडे आणि शांतता ठिकाणाच्या साैंदर्यात आणखी भर घालते. इथे येऊन तुम्हाला शांततेचा अनुभव घेता येईल. जेव्हा आपण गर्दीपासून दूर एका शांत ठिकाणी जातो तेव्हा स्वत:ला समजून घेण्यास, अनेक गोष्टींबद्दल मनमोकळ्यापणाने विचार करण्यास आपल्याला वेळ मिळतो. शिवाय कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवण्यासाठीही हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरते. सोशल मिडियावर मशोबरा हे सर्वात शांततामय ठिकाण म्हणून ट्रेंड करत आहे. चला इथली प्रमुख आकर्षणे जाणून घेऊया.

मशोबरात फिरण्यासाठीची ठिकाणे

  • मशोबरातील रस्ते देखील फिरताना एक वेगळा अनुभव देतात कारण इथले रस्ते घनदाट जंगलांनी वेढलेले आहेत.
  • इथे तुम्ही आरक्षित वन अभयारण्यात मनसोक्तपणे फिरु शकता.
  • याचबरोबर इथे क्रेग्नानो नावचा इटॅलियन विला देखील आहे जिथे लावण्यात आलेले फूल आणि वनस्पती ठिकाणाला फेव्हरेट पिकनिक स्पाॅट बनवते.
  • इथली तत्तापानी नदी गरम पाण्याच्या झऱ्यासाठी खूप लोकप्रिय आहे.
  • इथे एक शिव गुफा देखील आहे जी रहस्यमयी अंधेरी गुफा असल्याचे म्हटले जाते.
  • मशोबाराच्या गावातच शिवाचे एक मंदिर देखील आहे. हे महासू देवताचे मंदिर आहे.
  • इथले चॅडविक फाॅल्स देखील फिरण्यासाठीचे एक सुंदर ठिकाण आहे. या धबधब्यातील पाणी एकदम स्वच्छ असते.
  • याशिवाय, राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान देखील उन्हाळ्यात पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरते.
Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

मशोबपा फिरण्यासाठी लागणारा खर्च

मशोबरा फिरण्यासाठी तुम्हाला बजेटमध्ये हाॅटेल्स, होम स्टे आणि रिझाॅर्ट्स राहायला मिळतील. या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुम्हाला मुंबईहून आधी शिमलाला भेट द्यावी लागेल आणि मग इथून तुम्ही मशोबराला जाऊ शकता. मशोबराच्या ट्रीपसाठी साधारण ६०००-१०,००० पर्यंतचा खर्च लागू शकतो.

Web Title: Peaceful hidden hill station near shimla perfect summer getaway travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
1

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
2

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
3

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…
4

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.