(फोटो सौजन्य – Pinterest)
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल
डेनिम
डेनिम जॅकेट हा पुरुषांसाठी हिवाळ्यातील सर्वोत्तम पोशाखांपैकी एक आहे. हे ट्रेंडी जंकिट टिकाऊ देखील आहे. शंभरवेळा धुतले तरी त्याची नवलाई टिकून राहते. जर तुमच्याकडे हे जॅकेट नसेल तर ते खरेदी करण्याची वेळ आली आहे. हे जॅकेट तुम्हाला फक्त एका ऋतुसाठीच नाही तर वर्षभरासाठी उपयुक्त ठरते.
वॉटरफॉल कार्डिगन
याचा जॅकेटमध्ये समावेश नसला तरी ओपन-फ्रंट ड्रेप स्टाईल आणि ड्रिप हेमलाइनची खासियतमुळे तुम्ही याचाही तुमच्या वार्डरोबमध्ये समावेश करण्यास हरकत नाही. उबदार पोशाखासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जी लोक अंगाने भारदस्त आहेत अर्थात जाडजूड आहेत त्यांच्यासाठी हा पोशाख खास आणि परफेक्ट ठरेल.
बॉम्बर जॅकेट
एके काळी हे जॅकेट यूएस एअर फोर्सच्या फ्लाइट क्रू मेंबर्सच्या पोशाखाचा भाग असायचे, पण सध्याच्या घडीला ॲथलीट्स, सेलिब्रिटी आणि सामान्या लोकांमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. एक अष्टपैलू फॅशन पीस म्हणून याकडे पाहले जाते. फ्रंट झिप क्लोजर, रिव्ड कॉलर आणि लवचिक कमरबंद हिवाळ्यात तुमच्या शरीराला उबदार ठेवते. याशिवाय ते तुम्हाला स्टायलिशही बनवते.
ट्रॅकर
ट्रक जॅकेट अमेरिकन फॅशनमचा घटक म्हणून लोकप्रियता मिळाली आहे. वर्कवेअर, स्पोर्टी स्टाइल किंवा कॅज्युअल हैंगआउटसाठी हे जॅकेट। सर्वोत्तम ठरते. ट्रक जॅकेट कोणत्याही पोशाखावर तुम्ही सहज वापरू शकता. सर्वोत्तम फिटिंगसह छातीवर दोन खिसे ही या जॅकेटची खासियत आहे. काळ्या रंगातील हे जॅकेट तुम्ही तुमच्या वार्डरोबमध्ये ठेवून तुम्ही तुमची स्टाईल अगदी कडक करु शकता. तुम्ही स्टाईल एकदम कडक करू शकता.
पार्कास जॅकेट
जॅकेट हे अनौपचारिक गटात मोडणारी आहेत. सिंथेटिक फायबर किंवा पॉलिस्टरने भरलेले असतात. फर-लाइन हुड याची एक खासियत असते. दुहेरी उबदार अस्तर आणि आरामदायी असलेले जॅकेट कडाक्याच्या थंडीत उपयुक्त ठरते. कॅज्युअल लुकसाठी जीन्स आणि बूटसह स्टाईल परिपूर्ण करा.
Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!
लेदर
बऱ्याचदा या धाटणीतील जॅकेटला ‘बाइकर जॅकेट’ असे संबोधले जाते. पण रॉक स्टाईलचा दृष्टिकोण असेल तर तुमच्याकडे बाईक असायलाच पाहिजे असे काही नाही.
पफर
पफर जॅकेट्स रझईयुक्त डिझाईनने सुसज्ज असते. ते स्टिचिंग दरम्यान फुगलेले दिसते. त्यात एक अस्तर देखील असते ज्यामुळे कड्याक्याच्या थंडीतही उबदारपणा टिकून राहतो.






